भारतीय शेअर बाजारांमध्ये ऑगस्टमध्ये आलेली निम्नता ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत जलदतेने परिवíतत झाली. गुंतवणूकदारांकरिता ही रॅली एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही आणि त्यांच्यामध्ये या रॅलीच्या मागे लपलेल्या कारणांवर वाद सुरु झाला आहे. मोठय़ा कालावधीनंतर बाजाराचे लक्ष्य सुरक्षित शेअर्सवरुन हटले आहे आणि विविध क्षेत्राबरोबरच बाजार भांडवलाच्या शेअर्समध्ये रुची दिसून आली आहे.
ही रॅली जागतिक व स्थानिक दोन्ही कारणांमुळे आली आहे. यातील सर्वात प्रमुख कारणांमध्ये फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे टेपिरगमध्ये होत असलेला विलंब मानला जाऊ शकतो. बाजाराचा अंदाज होता की, नियंत्रणाची सुरुवात सप्टेंबरमध्ये होईल. तथापि, फेडद्वारे चकित करणाऱ्या घोषणांचे तात्पर्य आहे की, सुलभ तरलता परिस्थिती आता आणखी काही काळाकरिता कायम राहील. हे जास्तीत-जास्त उदयोन्मुख बाजारांमध्ये मजबूत प्रवाहाला प्रोत्साहन देईल आणि भारतदेखील अपवाद नाही.
अमेरिकन कर्ज मर्यादा (डेट सििलग) बाबत असलेल्या असमंजसपणानेदेखील बाजाराला विश्वास दिला आहे की, हे जानेवारीमध्ये देखील होणे कठीण आहे. याने बाजाराला समर्थन दिले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारांमध्ये जवळ-जवळ ४.५ बिलियन डॉलरचा एफआयआय प्रवाह दिसून आला.
स्थानिक पुढाकारावर, रुपयांमध्ये स्थिरता व अनुमानातून चांगले परिणाम दोन प्रमुख निर्धारक राहिले आहेत, ज्यांनी बाजाराला हवा दिली. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे उचलण्यात आलेली पावले आणि व्यापार तोटय़ाचे आकडे अंदाजापेक्षा कमी राहिल्यामुळे चलनाला स्थिरता मिळाली आहे. बाजारामध्ये व्यापलेले भय संपले आहे आणि आता बाजाराने पुन्हा एकदा आाधारभूत तत्त्वांवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
एवढेच नाही, तर दुसऱ्या तिमाहीच्या निकालांबाबत नकारात्मक आशा होत्या, पण आतापर्यंत घोषित करण्यात आलेले परिणाम सकारात्मक राहिले आहेत आणि कमाईमध्ये घट होण्याऐवजी अधिकतर वाढ नोंदविण्यात आली आहे. या परिणामांमुळे बाजारामध्ये ताजी खरेदी दिसून आली आणि शेअर्सच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाली.
सध्याची गती आणि तरलता प्रवाह पाहता असे दिसून येते की ही रॅली अधिक काही काळाकरिता कायम राहू शकते. तथापि, भागिदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या रॅलीच्या दरम्यान स्थानिक गुंतवणूकदारांनी विक्रीची वृत्ती स्विकारली आहे. स्पष्ट आहे की, रिटेल गुंतवणूकदार या वाढीने उत्साहित नाहीत आणि प्रत्येक वाढीवर बाजारातून पसे काढून घेत आहेत.
ही रॅली पूर्णपणे तरलता प्रवाहाद्वारे चालत आहे का? की बाजार व अर्थव्यवस्थेच्या आधारभूत तत्त्वांमध्ये खरोखरंच परिवर्तन आले आहे? हे स्पष्टच आहे की, तरलता हेच कारक बळ आहे. अर्थव्यवस्थेकरिता, आकडे सांगतात की आपण निम्न स्तरापर्यंत पोहोचलो आहोत आणि याचा अंदाज लावणे कठीण आहे की या काळातून पार पडण्याकरिता आणखी किती वेळ लागेल.
तथापि, आरंभीची कॉर्पोरेट कमाई अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे, छोटय़ा कालावधीमध्ये बाजाराची गती तरलता प्रवाहाद्वारेच ठरविण्यात येईल. प्रवाह स्पष्टपणे जागतिक तरलता परिस्थिती व भारतातील उगवत्या दृश्यात्मकतेवर अवलंबून असेल. मध्यम ते दीर्घकालिक कालावधीत फंडामेंटलमध्ये सुधारणा चांगली बातमी असू शकते.
बाजारामध्ये आलेल्या या तेजीद्वारे एक धडा घेता येईल की, बाजारातून निघणे आता जवळ-जवळ अशक्य आहे आणि गुंतवणूकदारांनी मोठय़ा कालावधीमध्ये पसा उभारण्याकरिता गुंतवणूक कायम ठेवली पाहिजे.

लेखक एचडीएफसी लाईफचे
मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.