13 December 2017

News Flash

चिनी ग्राहकांच्या ‘कार्डसुलभ’ व्यवहारांसाठी ‘एनपीसीआय’चा पुढाकार

भारताच्या पंतप्रधानांना चीन दौऱ्यावरून परतून दोन दिवस होत नाही तोच चिनी ग्राहकांना येथील खरेदीचे

मुंबई: | Updated: May 22, 2015 3:23 AM

भारताच्या पंतप्रधानांना चीन दौऱ्यावरून परतून दोन दिवस होत नाही तोच चिनी ग्राहकांना येथील खरेदीचे व्यवहार सुलभ होण्याच्या हेतूने ‘नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) ने पुढाकार घेतला आहे. चीनमधील नागरिकांना क्रेडिट तसेच डेबिट कार्डाद्वारे खरेदी तसेच येथील एटीएमवर व्यवहार करता येणे यामुळे सोयीस्कर होणार आहे.
एनपीसीआयने यासाठी गुरुवारी चायना युनियनपेबरोबर एक करार केला. रिझव्‍‌र्ह बँकेची अंगीकृत संस्था असलेल्या एनपीसीआयद्वारे मुंबईत गुरुवारपासून भरविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या परिषदेदरम्यान या करारावर कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ए. पी. होटा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
या व्यवहारामुळे भारतातील बँकांना लाभ मिळणार असून त्यांच्यामार्फत उभारलेल्या एटीएम अथवा पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मुळे प्रति व्यवहार एक डॉलर शुल्क मिळू शकेल. चायना युनियनपेचे कार्ड यापुढे भारतातील सर्व बँकांमध्ये चालू शकेल. व्हिसा अथवा मास्टरकार्डसारखे आंतरराष्ट्रीय पेमेन्ट कार्ड नसलेले २० लाख चिनी लोक भारतात दरवर्षी येत असतात. देशात विविध बँकांचे १.९५ लाख एटीएम तर ११ लाख पीओएस आहेत. एनपीसीआयमार्फत त्यांचे व्यवहार होतात. कॉर्पोरेशनचे रूपे हे कार्डही विविध १७० देशांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

First Published on May 22, 2015 3:23 am

Web Title: npci ties up with china unionpay