नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या भारतातल्या सर्वात मोठय़ा सिक्युरिटीज डिपॉझिटरीने १.४ कोटी डिमॅट खात्यांमधल्या १०० लाख कोटींपेक्षा (१.५ लाख डॉलर) जास्त ठेवींचा विक्रमी टप्पा पार केला आहे. १३ नोव्हेंबर २०१५ अखेर या ठेवींची एकूण किंमत ११५ लाख कोटी रुपये (१.७५ लाख डॉलर) आहे. एनएसडीएलकडच्या डिमॅट मालमत्तेचा बाजारहिस्सा ८९ टक्के आहे. भारतातल्या सर्व बँकांमधल्या एकत्रित ठेवींपेक्षा जास्त एनएसडीएलकडे असणाऱ्या मालमत्तेची किंमत आहे. एनएसडीएल आणि भारतीय भांडवली बाजारासाठी गौरवाचा हा टप्पा मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.