भारतातील सर्वात मोठा भांडवली बाजार – राष्ट्रीय शेअर बाजारावरील एसएमई व्यासपीठांवर ऑगस्टमध्ये नोंदणीतील लक्षणीय वाढ राखली गेली आहे. एनएसईच्या इमर्ज आणि इमर्ज आयटीपी व्यासपीठांवर यामध्ये नागपूर आणि इंदूरमधील कंपन्यांनी नोंदणी केली आहे.
कॅपको इंडस्ट्रीजने गेल्याच आठवडय़ात इमर्ज आयटीपीवर नोंदणी केली असून नागपूरस्थित एमके टॅप्स आणि कटिंग टूल्स लिमिटेड कंपनीचीही एनएसईच्या इमर्ज व्यासपीठावर नोंदणी झाली तर मोहिनी फायबर्सने सोमवारी एनएसईच्या आयटीपीवर नोंदणी केली.
एमके टॅप्स आणि कटिंग टूल्स लिमिटेड (इटीसीटीएल) या विविध प्रकारच्या नळ आणि मशीन टूल्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज – इमर्ज या एसएमई प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. इटीसीटीएल ही विदर्भातील पहिली कंपनी असून एनएसईच्या इमर्ज व्यासपीठावर नोंदणी होणारी ती आठवी कंपनी आहे.
एनएसईच्या इमर्ज आयटीपी व्यासपीठाने इंदूरस्थित कॅपको इंडस्ट्रीज लिमिटेडला १२ ऑगस्ट २०१५ रोजी सहभागी करून घेतले आहे. २००७ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी इंधन तसेच हायड्रॉलिक तेलासाठी वापरले जाणाऱ्या फॅब्रिकेटेड टाक्यांचे उत्पादन करते. इमर्ज आयटीपी इंदोरस्थित मोहिनी फायबर्स लिमिटेडची नोंदणी सोमवारीच झाली.
एनएसईने सप्टेंबर २०१२ मध्ये इमर्ज या एसएमई व्यासपीठाचे अनावरण केले आणि इमर्ज आयटीपीचे उद्घाटन डिसेंबर २०१३ मध्ये करण्यात आले.
भारतातील आघाडीचा शेअर बाजार असलेल्यिा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने मागील अनेक वर्षांमध्ये एसएमईंना त्यांच्या इमर्ज या एसएमई व्यासपीठावर आयपीओ जारी करून निधी उभारण्यात मिळणाऱ्या फायद्यांबाबत शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; हे व्यासपीठ उद्योजकांना त्यांच्या वाढीसाठी तसेच नावीन्यपूर्णतेसाठी भांडवल उभारण्यास मदत करते आणि कंपन्यांना त्यांच्या नवीन गुंतवणूकदारांना एक कार्यक्षम एक्झिट शोधण्यासाठीच्या मूल्यासाठीही सहकार्य करते, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने स्पष्ट केले आहे.
एनएसई पर्यायी भांडवली विस्तार मार्ग जसे संस्थात्मक व्यापार व्यासपीठ (आयटीपी) सादर करतो. आयटीपी हा सुरुवातीच्या तसेच वाढत्या कंपन्यांसाठी त्यांची कामगिरी कर्जदार तसेच भावी गुंतवणूकदारांची नोंदणी इनिशियल पब्लिक ऑफरशिवाय (आयपीओ) करून दाखवण्यासाठी खास व्यासपीठ आहे.