News Flash

बँक घोटाळ्यांमध्ये ७१,५४३ कोटी फस्त

विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांची संख्या वाढली आहे.

विविध बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी उंचावली असून गेल्या वित्त वर्षांत ही रक्कम ७१ हजार ५४३ कोटी रुपयांवर गेली आहे. रकमेबाबत हे प्रमाण ७३.८ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०१९ अखेरच्या वर्षांत ६ हजार ८०१ बँक घोटाळ्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०१७-१८ मध्ये ही संख्या ५ हजार ९१६ होती व त्यातील रक्कम ४१ हजार १६७.०४ कोटी रुपये होती. बँक घोटाळे नोंदीत सर्वाधिक हिस्सा सार्वजनिक बँकांचा राहिला आहे.

अशा बँकांमधील घोटाळ्यांची प्रकरणे ३ हजार ७६६ व त्यातील रक्कम ६४ हजार ५०९.४३ कोटी रुपये नोंदली गेली आहे. १०० कोटी रुपयांवरील रकमेच्या घोटाळ्यांतील रक्कम ५२ हजार २०० कोटी आहे. कार्ड, इंटरनेट तसेच ठेवींबाबत झालेल्या घोटाळ्याचे प्रमाण ०.३ टक्के आहे. हा अहवाल दरवर्षी प्रदर्शित करण्यात येतो. रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी डिविडंट आणि सरप्लस फंडातून सरकाला १.७६ कोटी रूपयांची निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी रिझर्व्ह बँक १.२३ लाख कोटी सरप्लस फंडातून तर उर्वरित ५२ हजार ६३७ कोटी सरप्लर रिझर्व्हमधून देण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 8:40 am

Web Title: number of bank frauds increased 71 thousand crores fraud rbi jud 87
Next Stories
1 सीजी पॉवरच्या अध्यक्षपदावरून संस्थापक थापर यांची हकालपट्टी
2 डिजिटल अर्थव्यवस्थेपुढे ‘रोकडे’ प्रश्नचिन्ह
3 लवकरच उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीसाठी जलव्यवस्थापन
Just Now!
X