19 January 2021

News Flash

जीएसटी करदात्यांची संख्या दुपटीने वाढून १.२४ कोटींवर -अर्थमंत्रालय

जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा ६५ लाखांच्या आसपास असणारी करदात्यांची संख्या आता १.२४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

 

लोकांकडून कर भरला जाईल अशा पातळीवर वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचे दर आणले गेल्याचा सुपरिणाम करविषयक अनुपालनात वाढ करणारा झाला आहे आणि करदात्यांची संख्या दुप्पट म्हणजे १.२४ कोटीवर गेली आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा ६५ लाखांच्या आसपास असणारी करदात्यांची संख्या आता १.२४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने, सोमवारी केलेल्या ट्विप्पणीच्या मालिकेतून अर्थ मंत्रालयाने, जीएसटी आल्याने करांचा भार कमी झाल्याचा दावा केला. पूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट), अबकारी शुल्क, विक्री कर यांचा एकत्रित भार ३१ टक्क्यांपर्यंत जाणारा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:26 am

Web Title: number of gst taxpayers doubles to 1 24 crore ministry of finance abn 97
Next Stories
1 निर्देशांकांचा सहामाही उच्चांकी सूर
2 गुंतवणुकीचे धडे गणपतीकडून
3 सावधान, तेजीचे उधाण लवकरच भानावर येईल – दास
Just Now!
X