News Flash

खनिज तेल ५० डॉलरकडे

पुढील काही दिवसांसाठी होणारे खनिज तेलाचे व्यवहार हे ४९ डॉलर प्रतिपिंपप्रमाणे

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खनिज तेलाच्या दरातील चढ आता प्रतिपिंप ५० डॉलरनजीक पोहोचू पाहत आहे. इंधन दरातील तेजीचे मात्र विविध भांडवली बाजारात स्वागत होत आहे. सध्याचे तेल दर हे २०१६ मधील सर्वोच्च टप्प्यावर आहेत.
पुढील काही दिवसांसाठी होणारे खनिज तेलाचे व्यवहार हे ४९ डॉलर प्रतिपिंपप्रमाणे होत असल्याचे सध्या स्पष्ट होत आहे. काळे सोन्याचा सध्याचा दर हा गेल्या नोव्हेंबरच्या समकक्ष आहे. मात्र लवकरच ते ५० डॉलरची पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येत्या काही दिवसांमध्ये खनिज तेलासाठी पिंपामागे ५० डॉलर मोजावे लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे बीएमआय रिसर्चचे तेल व वायू विषयाचे विश्लेषक पिटर ली यांनी म्हटले आहे. चालू वर्षांच्या उर्वरित अर्धवार्षिकातही तेल दराचा प्रवास ४५ ते ५० डॉलर दरम्यान राहील, असेही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचे इंधन उत्पादन कमी होत आहे. याउलट चीनमध्ये इंधन उत्पादन वाढत आहे.
तेल दराने यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ३० डॉलर असा गेल्या १३ वर्षांतील तळ गाठला होता. तर जून २०१४ मध्ये तेलाचे दर १०० डॉलर प्रतिपिंपपर्यंत पोहोचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 8:04 am

Web Title: oil prices remain near 2016 highs on global supply disruptions
Next Stories
1 रघुराम राजन यांच्या हकालपट्टीची सुब्रह्मण्यम स्वामी यांची नव्याने मागणी
2 अर्थ-संक्षिप्त: एलईडी बाजारपेठेची ५० टक्के वृद्धी
3 फक्त दोन तिमाही जाऊ द्या; अधिक परतावा दृष्टिक्षेपात आहे!
Just Now!
X