27 October 2020

News Flash

तेल धक्का ; इराकमधील जिहादी हिंसाचाराने कच्च्या तेलाचा भडका

इराकमध्ये जोरदार हिंसाचार सुरू असल्याने आखातातून तेलपुरवठा खंडित झाला असून खनिज तेलाचे भाव गेल्या नऊ महिन्यातील उच्चांकी पातळीपर्यंत वाढले आहेत.

| June 14, 2014 01:04 am

इराकमध्ये जोरदार हिंसाचार सुरू असल्याने आखातातून तेलपुरवठा खंडित झाला असून खनिज तेलाचे भाव गेल्या नऊ महिन्यातील उच्चांकी पातळीपर्यंत वाढले आहेत. प्रति पिंप ११५ अमेरिकी डॉलरवर उसळलेल्या कच्च्या तेलाच्या दराने जगभरातील वित्तीय बाजारातही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
अमेरिकेतील वेस्ट टेक्सास येथे बॅरलला २.१३ डॉलर असलेले भाव १०६.५३ डॉलर झाले आहेत, १८ सप्टेंबर २०१३ पासूनचा हा उच्चांक आहे. युरोपच्या ब्रेन्ट क्रूडचे भाव ३.०७ डॉलरवरून लंडनच्या इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंजमध्ये ११३.०२ डॉलर झाले आहेत. जिहादींनी उत्तरेकडील एक शहर ताब्यात घेतल्यानंतर बगदादकडे आगेकूच सुरू केली असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपले सुरक्षा पथक स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. उत्तरेकडील किरकुक या तेल ठिकाणाचा ताबा कुर्दीश लोकांकडून जिहादी अतिरेक्यांनी घेतला आहे. त्यामुळे तेलाचे उत्पादन बंद होण्याच्या भीतीने बाजारपेठेत तेलाचे भाव वाढले, असे अँडी लेबो यांनी सांगितले. इराकचे तेल उत्पादन थांबल्याने आता किमती वाढल्या आहेत, इराक हा ओपेक मधील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. इराकमध्ये दिवसाला ३५ लाख बॅरल तेल उत्पादन होते व जगातील तेल साठय़ात त्याचा पाचवा क्रमांक लागतो. युरेशिया गटाने म्हटले आहे, की चीनकडून तेलाची कमी झालेली मागणी व लिबियातील फेरजुळणीमुळे खनिज तेल उत्पादनावरील ताण काहीसा कमी होईल.

गुंतवणूकदारांच्या पसंतीक्रमातही बदल
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
विश्लेषकांच्या मते कच्च्या तेलाने नवीन किंमत प्रांगणात प्रवेश केला असून, इराकमधील वातावरण लवकर निवळण्याची शक्यता नसल्याने किमती यापुढे आणखी चढत जातील असे चित्र आहे. शुक्रवारी प्रारंभीच्या सत्र बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपन्यांचे समभाग ८-९ टक्क्य़ांनी घसरले, तर केर्न इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज हे समभाग अर्धा ते दोन टक्क्य़ांनी वधारलेले दिसले. परंतु पुढे बाजारात पडझड वाढल्याने तेल व वायू निर्देशांकातील पेट्रोनेट एलएनजी वगळता सर्वच समभागांनी आपटी खाल्ली. केंद्रातील नवस्थापित मोदी सरकारबद्दलच्या सकारात्मकतेने गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांत चांगली मागणी मिळविणाऱ्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तेल वितरक कंपन्यांच्या समभागांकडून गुंतवणूकदारांचा पसंतीक्रम केर्न इंडिया, रिलायन्स, ओएनजीसी या तेल उत्पादक-उत्खनन कंपन्यांकडे कललेला दिसणे स्वाभाविक आहे. नजीकच्या कालावधीत कच्च्या तेलाचे  दर प्रतिपिंप १२० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:04 am

Web Title: oil prices rise further on growing iraq tensions
टॅग Crude Oil
Next Stories
1 टेलिनॉर मिळविणार यूनिनॉरवर संपूर्ण वर्चस्व
2 एअर एशिया इंडियाचे पहिले उड्डाण ‘हाऊसफुल्ल’
3 विशालवर ‘सिक्का’!
Just Now!
X