रेडिओ टॅक्सी सेवेसाठी वापरात येणारे मोबाईल अॅप ‘ओला’ने आता त्यांच्या अॅपवरून ओला कॅबसह ‘टॅक्सीफॉरश्युअर’ या अन्य सेवेसाठी बुकिंगची सोय ग्राहकांसाठी खुली केली आहे. ओला अॅपवर ‘टॅक्सीफॉरश्युअर’ असा नवीन पर्याय त्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. प्रारंभी केवळ मुंबई आणि दिल्ली अशा टॅक्सी सेवेसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या महानगरांतील ग्राहकांसाठीच ही सोय उपलब्ध झाली असल्याचे ओलाने स्पष्ट केले आहे.