सरकते जिने व उद्वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठे कंत्राट या क्षेत्रातील आघाडीच्या ओटिस इलेव्हेटर कंपनीला मिळाले आहे. हैदराबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला ती तब्बल ६७० सरकते जिने पुरविणार आहे. एल अ‍ॅण्ड टी मेट्रो रेल लिमिटेडमार्फत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ओटिसकडून २६० सरकते जिने जेन २ प्रीमियर या मॉडेलचे व ४१० जिने ५२० एनपीई मॉडेलचे बसविले जाणार आहेत. ६६ विविध मेट्रो स्थानके, कार्यशाळा आणि आगारातील इतर इमारतींमध्ये कंपनीची स्वयंचलित वाहतूक उत्पादने बसविण्यात येणार आहेत. दोन वर्षे वॉरंटी कालावधीनंतर १० वर्षांसाठी ओटिसकडूनच या यंत्रांची देखभालही केली जाईल. याबाबतचा एक करार नुकताच उभय कंपन्यांदरम्यान झाला.