रद्द केलेल्या कोळसा खाणी सरकारी उपक्रमांना अदा करणाऱ्या लिलाव प्रक्रियेला बुधवारी सुरुवात झाली. या खाणींमध्ये एक खाण केवळ स्टील क्षेत्रातील कंपनीला देण्यात आली असून उर्वरित सर्व या ऊर्जा क्षेत्राला बहाल करण्यात येणार आहेत.
याबाबतची करार प्रक्रिया येत्या महिनाअखेपर्यंत होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील २३ खाणींची लिलाव प्रक्रिया १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात २५ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान कोळसा खाणी लिलाव प्रक्रिया पार पडेल.
सरकारी उपक्रमांतील कंपन्या, उपकंपन्यांमार्फत या खाणींसाठी मागणी नोंदविली गेल्याने त्याबाबतचा निर्णय जारी करण्यात आल्याचे केंद्रीय कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. देशातील ऊर्जा प्रकल्पांना सध्या कोळशाचा तुटवडा भासत असून  आवश्यकता भासल्यास भविष्यात त्यांना आणखी खाणी दिल्या जातील.