मालकी, खासगी आस्थापनाची विदारक स्थिती

उत्पादनाला असलेली कमी मागणी, थंड बस्त्यातील प्रकल्प, सरकार स्तरावरून असहकार, वाढता कर्जभार, बँकांची थकित देणी अशा साऱ्या समस्याचा सामना देशातील आस्थापनांना करावा लागत असून देशातील २६ टक्के मालकी कंपन्यांना तर १५ टक्के खासगी कंपन्यांना धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत केंद्र सेवा पुरवठादार क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ‘एक्सपेरियन’ या कंपनीने याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालात व्यावसायिक मार्गदर्शिकेचा समावेश करण्यात आलेला असून यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगधंद्यंची ताकद एकत्र करून कर्जाचे मूल्यनिर्धारण (मूल्यांकन) करण्यास मदत होते, असा दावा करण्यात आला आहे.

अशा प्रकारे कर्जाचे मूल्यांकन करण्याची ही बाब औद्य्ोगिक क्षेत्रातील एक अनोखी बाब मानली जात आहे. व्यवसायातील पतजोखीम मूल्यांकनासाठी एक्सपेरियनने व्यावसायिक मार्गदर्शिका आणली आहे  ‘एक्सपेरियन Rेडिट ब्युरो’कडे ५२.५० कोटींहून अधिक व्यापारी आहेत. तर व्यापारी गटाकडे २.५० कोटी व्यापारी आहेत.

‘एक्सपेरियन Rेडिट ब्युरो’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मोहन जयारमन यांनी सांगितले की, एक्सपेरियन ब्युरोने केलेल्या भारतीय उद्योगजगताच्या अभ्यासानुसार, भारतातील २६ टक्के मालकी कंपन्या (प्रोपरायटरशिप फर्म) आणि १५ टक्के खाजगी कंपन्या (प्रायव्हेट कंपनी) धोकादायक स्थितीत आहेत. भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर मालकी कंपन्या आहेत. ३०० ते ९०० श्रेणीच्या दरम्यान व्यावसायिक मूल्यनिर्धारण ठेवून ‘एक्सपेरियन कमर्शिअल स्कोअर’ (एक्सपेरियन व्यावसायिक मार्गदर्शिका) तयार करण्यात आली आहे. यामुळे मालकांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या काय आहेत याचे व्यापक दृश्य त्यांना समजू शकेल. भागीदारी आणि मर्यादित कर्ज असणाऱ्या (लिमिटेड लाएबिलिटी) कंपन्यांचे तसेच वैयक्तिक स्तरावर कर्ज असणाऱ्यांचे एक ते दहाच्या दरम्यान मूल्यांकन करून त्यांनी घेतलेल्या कर्जाची जोखीम कितपत आहे (रिस्क रेटिंग) हे या मार्गदर्शिकेत विशद करण्यात आले आहे. लघु आणि मध्यम, तसेच मोठय़ा उद्य्ोगांना आपली व्यावसायिक जोखीम अभ्यासण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

भारतात औपचारिक कर्ज घेणाऱ्यांमध्ये साधारण ४५ टक्के मालक कंपन्या असून त्यांना असणारा सर्वाधिक धोका लक्षात घेता या व्यावसायिक मूल्यांकनाच्या आणि खात्याच्या तपासणीच्या आधारे बँका आवश्यक ती माहिती मिळवून कर्ज देण्याचा निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे जयारमन यांनीसागितले. तसेच या व्यावसायिक मार्गदर्शिकेच्या सादरीकरणामुळे आमच्या पक्षकारांना/ग्राहकांना फायदा होईलच. शिवाय सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यासारख्या नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून भारतीय उद्योगधंदे वाढीस लागण्यात मदतच होईल, असे त्यांनी नमूद केले.

एक्सपेरियन मर्यादित कर्ज असणाऱ्या कंपन्यांसाठी आर्थिक, कायदेशीर कागदपत्रांची व्यवस्था, संचालकीय कामकाज, शुल्क आदी विविध विषयांशी संबंधित माहितीचे वर्धित आवृत्ती असणारे अहवाल बनवण्याची सेवा उपलब्ध करून देते.