भांडवली बाजारात ‘पार्टिसिपेटरी नोट्स’च्या (पी-नोट्स) माध्यमातून होणारी तीन महिन्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचली आहे. फेब्रुवारीमध्ये या माध्यमातून १,७२,७२८ कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये ही रक्कम २८ अब्ज डॉलर आहे. उच्च मालमत्ताधारक तसेच विदेशी हेज फंड यांच्यामार्फत समभाग, रोखे तसेच डेरिव्हेडिव्हजमध्ये प्रत्यक्ष भांडवली बाजारात गुंतवणूक केली जाते. अशी गुंतवणूक करण्यास सेबीने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना परवानगी देण्यात आली आहे. २०१४ च्या पहिल्या महिन्यात, जानेवारीत ‘पी-नोट्स’मधील गुंतवणूक १,६३,३४८ कोटी रुपये होती. डिसेंबर २०१३ नंतर प्रथमच ही गुंतवणूक वाढली आहे. यापूर्वी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही गुंतवणूक वाढली होती.

रुपया सात महिन्याच्या वरच्या टप्प्यावर
भांडवली बाजारात सप्ताहारंभी उत्साह संचारला असतानाच परकी चलन व्यासपीठावरही स्थानिक चलनाने अमेरिकन डॉलरसमोर ३० आठवडय़ांचा सर्वोच्च टप्पा पार केला. १२ पैशांनी उंचावत रुपया ६०.७७ पर्यंत उंचावताना ६ ऑगस्ट २०१३ च्या याच पातळीपर्यंत विसावला. व्यवहारात तो ६०.६४ पर्यंत झेपावला. तर ६०.९२ अशी नरम सुरुवात करणाऱ्या रुपयाचा दिवसाभरातील तळ ६०.९३ राहिला. शुक्रवारीही तो ४५ पैशांनी वधारला होता.