मागील २०१४ च्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत म्हणजे २०७१ संवत्सरात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर बाजारात सूचिबद्धतेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था म्हणून यंदा पेन्टोमॅथ कॅपिटल अ‍ॅडव्हायजरी प्रा. लि. या कंपनीला मानाचे स्थान मिळाले आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारात होणाऱ्या मुहूर्ताच्या सौद्यांप्रसंगी पेन्टॉमॅथचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावथ यांना बीएसईचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आशीष चौहान यांच्या हस्ते सन्मानित करम्यात आले. र्मचट बँकर या नात्याने पेन्टोमॅथ कॅपिटलने भागविक्रीचे व्यवस्थापन पाहिलेल्या कंपन्यांचे आकारमान आणि मूल्य या काळात सर्वाधिक राहिले आहे. शिवाय बीएसईद्वारे विकसित एसएमई मंचावरील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ज्या पाच कंपन्यांना यंदा सन्मानित करण्यात आले, त्यापैकी तीन कंपन्यांच्या भागविक्रीचे नेतृत्त्वही पेन्टोमॅथ कॅपिटलनेच केले होते. बीएसई एसएमई मंचावर सध्या १०० च्या घरात छोटय़ा कंपन्या सूचिबद्ध झाल्या आहेत.