४०० कोटी रुपये उभारण्याचे नियोजन
बंगळुरू येथील क्वेस कॉर्प लिमिटेड या थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड व अजित इसाक प्रवर्तित कंपनीकडून भागविक्रीसाठी (डीआरएचपी) प्रस्ताव गुरुवारी सादर केला. ४०० कोटी रुपयांचे भांडवली समभाग या माध्यमातून विक्री करण्याची संमती कंपनीने सेबीकडून मागितली आहे.
कर्मचारी भरती, तात्पुरती कर्मचारी भरती (टेम्पररी स्टाफिंग), तंत्रज्ञानविषयक कर्मचारी भरती (टेक्नोलॉजी स्टाफिग), आयटी उत्पादने आणि पर्याय, कौशल्य विकास, पे-रोल व कम्पलायन्स मॅनेजमेंट, विश्वासू सुविधा व्यवस्थापन आणि उद्योग व्यवस्थापन अशा र्सवकष सेवांची क्वेस कॉर्प देशातील अग्रणी पुरवठादार आहे. कंपनीचा संपूर्ण भारतात २४ शहरांमध्ये ४३ कार्यालये असा विस्तार आहे.
अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल होल्डिग्ज आणि येस सिक्युरिटीज या कंपन्या या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहणार आहेत.