News Flash

‘जीएसटी’पूर्वी प्रवासी वाहन विक्रीत घसरण

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत गेल्या महिन्यात कमालीची घसरण नोंदली गेली आहे.

| July 11, 2017 02:33 am

 

जूनमध्ये सहा महिन्यातील सुमार नोंद

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत गेल्या महिन्यात कमालीची घसरण नोंदली गेली आहे. जूनमधील विक्री वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तब्बल ११.२१ टक्क्य़ांनी घसरून १,९८,३९९ झाली आहे. जूनमधील घसरणीच्या रूपात गेल्या सहा महिन्यात प्रथमच वाहन उद्योग नकारात्मक प्रवास नोंदविणारा ठरला आहे.

जुलैपासून देशात वस्तू व सेवा करप्रणाली लागू होत असताना जूनमध्ये वाहन उत्पादकांनी घसघशीत सूट सवलतींसह मर्यादित वाहन पुरवठा केला होता. तसेच वितरकांनीही कमी वाहन मागणी जूनमध्ये नोंदविली होती. जुलैपासून सर्वच गटातील वाहनांच्या किंमतींमध्ये कमी – अधिक फरक पडला असून १ ते १५ टक्के अधिभारही लागू झाला आहे.

एकूण प्रवासी वाहनांमध्ये कार विक्री गेल्या महिन्यात ११.२४ टक्क्य़ांनी घसरून १,३६,८९५ नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१६ मध्ये देशातील कार विक्री अधिक, १,५४,२३७ होती. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मधील निश्चलनीकरणाच्या कालावधीतही देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री १.३६ टक्क्य़ाने घसरली होती. चालू एकूण आर्थिक वर्षांसाठी प्रवासी वाहन विक्रीचा वेग अवघा ७ ते ९ टक्के असेल, असे अंदाजित करण्यात आले आहे.

वाहन उत्पादकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ अर्थात सिआमने सोमवारी जाहीर केलेल्या वाहन विक्रीच्या प्रवासात मोटरसायकलची विक्री यंदाच्या जूनमध्ये २.१८ टक्क्य़ांनी वाढून ९,६४,२६९ झाली आहे. तर एकूण दुचाकी विक्री ४ टक्क्य़ांनी वाढून ती १५,२७,०४९ नोंदली गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2017 2:33 am

Web Title: passenger vehicles sales gst
Next Stories
1 देशातील ५५ टक्के जनता ‘जीएसटी’विषयी अनभिज्ञ
2 नवउद्यमींचा ‘ऑनलाइन ते ऑफलाइन’ प्रवास
3 जीएसटी: कही खुशी…कही गम!
Just Now!
X