26 February 2021

News Flash

एटीएमद्वारे सोन्याची नाणी आणि मुव्ही तिकीटांची खरेदी शक्य, कर्जसुद्धा मिळेल!

लवकरंच एटीएम मशिनद्वारे बील भरणे, मूव्ही आणि फ्लाइट तिकिटाची खरेदी करणे शक्य होणार.

प्रातिनिधिक छायाचित्र

पैसे काढणे अथवा भरण्यासाठी उपयोगात येणारे एटीएम मशिन भविष्यात विविध कामे करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आता एटीएम मशिनद्वारे बील जमा करणे, मुव्ही आणि फ्लाइटचे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. डेबिट कार्ड अथवा क्रेडीट कार्डाचा वापर न करता, केवळ नोंदणीकृत मोबाईल आणि आधार कार्डाच्या माध्यमातून ही सर्व कामे करणे शक्य होणार आहे. या नव्या एटीएम मशिनद्वारे बील भरणा करण्यापासून चालू बाजारभावाने सोन्याची नाणीदेखील खरेदी करता येतील. देशात लवकरच लोक एटीएमच्या माध्यमातून अशाप्रकारची अनेक कामे पार पाडताना दिसतील. ‘एफएसएस’, ‘सीएमएस’, ‘एजीएस’सारख्या एटीएम मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या अनेक कामं करणारी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एटीएम मशिन्स लॉन्च करणार असल्याचे समजते. या मशिनद्वारे फॉरेन एक्स्चेंज, लोन रिपेमेंट, बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्जसारखी कामेदेखील करणे शक्य होईल. मुंबईतील ‘एजीएसच्या इनोव्हेशन सेंटर’मध्ये सोन्याची नाणी देणाऱ्या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. या मशीनद्वारे प्रमाणपत्रासह सोन्याची नाणी प्राप्त करता येऊ शकतात.

सोन्याची नाणी प्रदान करणारे वैशिष्ट्य भारतीय बाजारपेठेत आकर्षणाचा विषय ठरणार आहे. आमच्या ‘सीआयएनईओ सी४०६०’ मॉडेलच्या मशीनमध्ये अनेक वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. या मशीनमध्ये अन्य वैशिष्ट्यांसोबत पासबुक आणि स्टेटमेंट प्रिंटिंगबरोबरच सोन्याची नाणी प्राप्त करण्याचे वैशिष्ट्य अंतर्भुत करण्यात आल्याची माहिती एजीएसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवि गोयल यांनी दिली. या मशीनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील लक्ष पुरविण्यात आले असून, आग आणि मशीन बंद पडण्यासारख्या समस्यांचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बँकेत खाते उघडण्यापासून डेबिट कार्ड इश्यू करण्याचे कामदेखील या मशीन्सद्वारे शक्य होणार असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबरच ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज आणि कारचे इंन्शुरन्स करणेदेखील शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:11 pm

Web Title: pay bills book movie tickets buy gold coin with certificate at atm
Next Stories
1 ‘हल्ल्या’च्या वार्तेने बाजाराचा थरकाप ; सेन्सेक्सची ‘ब्रेग्झिट’नंतरची मोठी गटांगळी
2 जागतिक बाजारात मात्र उसळी
3 ‘लोकसत्ता अर्थसल्ला गुंतवणुकीचा योग्य मार्ग दाखविणार!
Just Now!
X