News Flash

‘पेब्स’ची १५७ कोटींची भागविक्री २५ ऑगस्टपासून

विशेषीकृत रचनेच्या स्टील उत्पादनांची निर्माती व वितरक असलेल्या हैदराबादस्थित पेन्नार इंडस्ट्रीजचे एक अंग असलेल्या पेन्नार इंजिनीअरिंग बिल्डिंग सिस्टीम्स लि. (पेब्स) आता भांडवली बाजारात सूचिबद्धता मिळवीत

| August 19, 2015 03:51 am

विशेषीकृत रचनेच्या स्टील उत्पादनांची निर्माती व वितरक असलेल्या हैदराबादस्थित पेन्नार इंडस्ट्रीजचे एक अंग असलेल्या पेन्नार इंजिनीअरिंग बिल्डिंग सिस्टीम्स लि. (पेब्स) आता भांडवली बाजारात सूचिबद्धता मिळवीत आहे. कंपनीने येत्या २५ ऑगस्टपासून प्रारंभिक भागविक्री प्रत्येकी १७० रु. ते १७८ रु. या दरम्यान प्रस्तावित केली आहे. २७ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणाऱ्या या भागविक्रीतून कमाल १५७ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.
पेब्स ही प्री-इंजिनीअर्ड बांधकाम क्षेत्रात जानेवारी २०१० पासून कार्यरत आहे. पारंपरिक बांधकाम तंत्राच्या तुलनेत प्री-इंजिनीअर्ड बांधकामाची पद्धती ही एकूण खर्चात २० ते ३० टक्क्यांची बचत करते. या व्यवसायात असलेली ही शेअर बाजारात सूचिबद्ध होत असलेली पहिलीच कंपनी असेल, असे पेब्सचे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. राव यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत कंपनीने १८.५८ लाख चौरस मीटर इतक्या प्री-इंजिनीअर्ड इमारतींचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यात बहुतांश औद्योगिक वापराच्या इमारती आहेत. लार्सन अँड टुब्रो, अल्टाट्रेक, व्होल्वो, एमआरएफ वगैरे आघाडीच्या पाच ग्राहकांचा कंपनीच्या उलाढालीत निम्म्याहून अधिक वाटा आहे. मार्च २०११ अखेर १४६.१२ कोटी रु. असलेला कंपनीचा महसूल मार्च २०१५ अखेर ३६४.३२ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीकडे सध्या ३६० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स असून त्यात विद्यमान बडय़ा ग्राहकांकडून दुसऱ्यांदा आलेल्या कामांचे प्रमाण जवळपास ४० टक्के आहे, असे राव यांनी सांगितले. भागविक्रीतून येणाऱ्या निधीपैकी सुमारे ३४ कोटी रुपये कंपनीवरील कर्जाच्या परतफेडीसाठी तसेच खेळते भांडवल व विस्तार योजनेवर खर्च होणार आहेत. व्यक्तिगत गुंतवणूकदारांना या बुक-बिल्डिंग पद्धतीच्या भागविक्रीत किमान ८० समभाग व त्यापुढे ८०च्या पटीत बोली लावणारा अर्ज करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:51 am

Web Title: pebs plans to raise rs 156 crore through ipo
Next Stories
1 आयजी इंटरनॅशनलचा होरा आफ्रिकी फळांच्या व्यापाराकडे!
2 दोन वर्षांत ५० विक्री दालनांचे ‘स्पेसवूड’चे लक्ष्य
3 रुपया दोन वर्षांच्या तळात
Just Now!
X