03 June 2020

News Flash

दर्दींची बँकांमध्ये गर्दी!

विलीनीकरण प्रक्रियेत सहभागी बँक कर्मचाऱ्यांना अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

संग्रहित छायाचित्र

करोनाचे संकट गहिरे होत असतानाच बँक व्यवस्थेवरील ताण नवे वित्त वर्ष सुरू झाले तसा वाढत आहे. वेतन, निवृत्तीवेतन आदींसाठी ग्राहक, खातेदारांच्या गर्दीबरोबरच शुक्रवारपासून सुरू झालेल्या सरकारच्या लाभार्थी हस्तांतरणाचे आव्हानही उभे ठाकले आहे. विलीनीकरण प्रक्रियेत सहभागी बँक कर्मचाऱ्यांना अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

शुक्रवारी, पहिल्या दिवशी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अनेक बँक शाखांमध्ये गर्दी होती. पंतप्रधान गरीब कल्याण सहाय्याच्या माध्यमातून तब्बल ७४,११२ खात्यांमध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा केले गेले. बँक खाते क्रमांकाच्या शेवटी ० किवा १ आहे अशा ग्राहकांची रक्कम गुरुवारीच जमा झाली. तर बँक खात्याच्या शेवटी २ व ३ क्रमांक असलेल्यांची रक्कम शुक्रवारीच जमा झाली. बँक खात्याच्या शेवटी ४ व ५ क्रमांक असणाऱ्यांची रक्कम शनिवार, ४ एप्रिलला; ६ व ७ क्रमांक असलेल्या खातेदारांची रक्कम ५ तारखेला तसेच ८ व ९ क्रमांक असेल्यांच्या बँक खातेदारांना ६ एप्रिलला रक्कम मिळणार आहे.

या तारखांना जमा झालेली रक्कम संबंधित खातेदारांना त्या तारेखेच्या दुसऱ्या दिवशी काढता येणार आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदी कालावधीच्या सुरुवातीलाच सरकारने ही योजना   स्पष्ट केली होती.

एप्रिलमध्ये निम्मे दिवस बँका बंद!

अपुरे मनुष्यबळ आणि सद्य विस्कळीत नियोजनस्थिती कायम असतानाच नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात तब्बल १५ दिवस बँकेचे व्यवहार बंद राहत आहेत. पहिल्या बंद व्यवहारदिनाला लागून गुरुवारच्या रामनवमीच्या सुटीची जोड मिळाली होती. तर चालू महिन्यात विविध निमित्ताने ९ सुटय़ा आहेत. त्यातच दुसरा व चौथा शनिवार, रविवार मिळून १५ सुट्टय़ा होत आहेत. महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेले विस्कळीत व्यवहार महावीर जयंती, गुड फ्रायडेसारख्या सुट्टय़ांमुळे दोन आठवडय़ात अधिक तीव्र रूप घेणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:12 am

Web Title: people crowded in banks abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : प्रकाशाची प्रार्थना!
2 गुंतवणूकदारांना वित्त वर्षांरंभीच फटका
3 हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये  ‘जीएसके’चे विलीनीकरण
Just Now!
X