पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड या देशातील सर्वात मोठय़ा डिजिटल बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेकडून ३१ डिसेंबर २०१८ पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी ‘केवायसी’ सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये बचत किंवा चालू खाते उघडू शकतील.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गुप्ता यांनी, २०१९ अखेरपर्यंत आणखी १० कोटी ग्राहक मिळवण्याचे ध्येय जाहीर केले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना सध्या मोफत बँकिंग सेवेसह बचतीवर वार्षिक ४% व्याज दिले जाते.