पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी कपात सुरुच आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ४० पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ३७ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत शनिवारी पेट्रोल ८५. ९३ रुपये तर डिझेल ७७.९६ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याचा याचा फायदा भारताला झाला आहे. पेट्रोल- डिझेलच्या उत्पादनावरील खर्च कमी झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत.

शनिवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८५. ९३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ७७. ९६ रुपये इतके आहे. तर दिल्लीत शनिवारी पेट्रोल ४० तर डिझेल ३५ पैशांनी स्वस्त झाले.  दिल्लीत पेट्रोल ८०. ४५ रुपये आणि डिझेल ७४. ३८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. मुंबईत गेल्या दहा दिवसांमध्ये डिझेल १ रुपये ३९ पैशांनी आणि पेट्रोल २ रुपये ३६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रतिलिटरनुसार)

पुणे
पेट्रोल – ८५. ७३ रुपये

डिझेल – ७६. ५४ रुपये

नागपूर
पेट्रोल – ८६. ४२ रुपये

डिझेल – ७८. ४९ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८६. ९८ रुपये

डिझेल – ७९. ०२ रुपये