आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये उतार नोंदला गेल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात सुरुच आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर २५ पैशांनी आणि डिझेलचे दर प्रतिलिटर आठ पैशांनी कमी झाले.

बुधवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल ८६. ३३ रुपये तर डिझेल ७८. ३३ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. दिल्लीत पेट्रोल ८०. २५ रुपये आणि डिझेल ७४. ७३ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतातही पेट्रोल व डिझेलच्या उत्पादनावरील खर्चातही घट झाली आहे.याचा लाभ तेल कंपन्या ग्राहकांना देत आहेत. मुंबईत गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल १ रुपये ९७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचे दर ९८ पैशांनी कमी झाले आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

पुणे
पेट्रोल – ८६. १३ रुपये
डिझेल- ७६. ९० रुपये

नागपूर
पेट्रोल – ८६. ८१ रुपये
डिझेल – ७८. ८६ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ३८ रुपये
डिझेल – ७९. ३९ रुपये