27 January 2021

News Flash

‘पीएफसी’चे ५,००० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे

आजपासून खुली विक्री, मुदतठेवीपेक्षा जास्त व्याज

(संग्रहित छायाचित्र)

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) या ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या वित्तपुरवठा संस्थेने ५ हजार कोटींचे अपरिवर्तनीय रोखे बाजारात आणले असून १५ जानेवारीपासून खुली विक्री होणार आहे. या रोख्यांवर मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे.

देशातील विविध प्रकारच्या पारंपरिक व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी या ५ हजार कोटींचा उपयोग केला जाणार आहे. मूळ रोखे ५०० कोटी व लोकांच्या प्रतिसादानुसार आणखी ४५०० कोटी अशी ही एकूण ५ हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांची खुली विक्री होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ती होईल. तीन, पाच, १० व १५ वर्षे मुदतीचे हे रोखे असतील व त्यावर वार्षिक ४.६५ टक्के ते १५ वर्षांंसाठी दरवर्षी ७.१५ टक्के व्याज देण्यात येईल, अशी माहिती पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्रसिंग धिल्लन यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजकाल बॅंकांच्या मुदत ठेवींचे दर कमाल ६ टक्कय़ांपर्यंत घसरले असताना सामान्य गुंतवणूकदारांना सव्वा सात टक्के व्याज कमावण्याची ही संधी आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद अपेक्षित असून त्यानंतर आणखी ५ हजार कोटी रुपयांचे रोखे आणण्याचा विचार करू, असेही रवींद्रसिंग धिल्लन यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:14 am

Web Title: pfc rs 5000 crore unchangeable bonds abn 97
Next Stories
1 नवीन वेतन नियमांना महिनाअखेपर्यंत अंतिम रूप
2 ..तर विकास दर ६%!
3 पेट्रोल शंभरीच्या उंबरठय़ावर
Just Now!
X