News Flash

‘त्या’ ११ बँकांना सरकारचे सर्वतोपरी अर्थसहाय्य – गोयल

रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे ‘पीसीए’खाली आणल्या गेलेल्या ११ सरकारी बँकांसंबंधी गुरुवारी दिल्लीत बैठक झाली.

| May 18, 2018 03:57 am

पियूष गोयल. (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : त्वरित सुधारणा कृती (पीसीए) आराखडय़ांतर्गत रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध आणलेल्या ११ सार्वजनिक बँकांना सरकार आवश्यक ते सर्व आर्थिक सहकार्य करेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ खात्याचे नवे मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी दिली.

रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे ‘पीसीए’खाली आणल्या गेलेल्या ११ सरकारी बँकांसंबंधी गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. अर्थ खात्याचा कार्यभार हाती आलेल्या गोयल यांनी या बैठकीला संबोधित केले. या बँकांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

वाढत्या थकित कर्जापोटी नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या ११ बँका रिझव्‍‌र्ह बँकेने ‘पीसीए’खाली आणल्या आहेत. या बँकांनर्ी सुधारणेचा आराखडा सरकारकडे सादर करणे बंधनकारक आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने टाकलेल्या र्निबधानंतर या बँकांच्या कर्ज आणि लाभांश वितरणावर मर्यादा आल्या आहेत. संबंधित बँकांवर शाखा विस्तारही अवघड बनला असून,  व्यवस्थापन खर्चाला आळा घालण्यासाठी भत्ते, मानधनावरही अंकुश ठेवण्यात आला आहे.

या बँका सुधारणा आराखडा लवकरच सादर करतील, असा विश्वास व्यक्त करीत गोयल यांनी संबंधितांना भांडवलाबाबत सरकार सहकार्य करेल, असे स्पष्ट केले.

या ११ बँकांमध्ये देना बँक, अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन, आयडीबीआय, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:51 am

Web Title: piyush goyal promises help to 11 public sector bank
Next Stories
1 निरव घोटाळ्याची माहिती देण्यास विलंब सेबीचा ‘पीएनबी’वर ठपका
2 ‘मिड कॅप’चे आकर्षक मूल्य अबाधित – महिंद्र एमएफ
3 साखरेपाठोपाठ गुळाचे दरही घसरले
Just Now!
X