१ एप्रिलपासून देशात प्रमुख सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार आहे. त्यापूर्वीच पंजाब नॅशनल बँकेनं आपला नवा लोगो जारी केला आहे. १ एप्रिल पासून यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) या बँकांचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पीएनबीनं नवा लोगो जाहीर केला आहे. नव्या लोगोमध्ये या तिनही बँकांची चिन्ह वापरण्यात आली आहेत.

“यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांसोबत पंजाब नॅशनल बँक एका नव्या रूपात येणार आहे. सोप्या आणि स्मार्ट बँकींगसाठी आमच्यासोबत जोडले जा,” असं ट्विट पंजबा नॅशनल बँकेकडून करण्यात आलं आहे.

“ज्या बँकांचं विलिनीकरण होत आहे त्यांच्यासाठी काळजीची गरज नाही. चांगल्या बँकींग सेवेसाठी तीन बँक एकत्र येत येत आहे. तुमची काळजी आम्ही समजू शकतो. विलिनीकरणानंतर पुढील माहिती मिळेपर्यंत तुमचे अकाऊंट डिटेल्स तेच राहतील,” असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त बँकेच्या ग्राहकांना जुनंच चेकबुक आणि पासबुकसोबत आपलं अकाऊंट वापरता येणार असल्याचंही बँकेनं नमूद केलं आहे.