नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या हिरे व्यापारी निरव मोदी थकित कर्ज फसवणूक प्रकरणात चर्चेत आलेल्या तत्कालिन अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यन यांना सरकारने अखेर निलंबित केले आहे. याचबरोबर याबाबत कारवाई करण्यास सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे.

उषा अनंतसुब्रमण्यन या सध्या अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा आहेत. मात्र पंजाब नॅशनल बँकेतील फसवणूक प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांचे या बँकेवरील अधिकार गोठविण्यात आले होते. यानुसार बँकेच्या अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक पदावर कायम राहूनही त्यांना निर्णय मर्यादा होत्या.

Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
Aap with iNdia Aghadi
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत महारॅलीचंं आयोजन!
Shaktikanta Das Nirmala Sitharaman
पतधोरण बैठकीपूर्वी रिझर्व्ह बँक गव्हर्नर-अर्थमंत्र्यांची भेट

१४,००० कोटी रुपयांच्या बनावट पतहमीपत्र प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने उषा यांचे नाव आरोपपत्रात नोंदविले आहे. याच प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक संजीव शरण यांच्याविरुद्धही कारवाई सध्या सुरू आहे.

उषा या पंजाब नॅशनल बँकेत ऑगस्ट २०१५ ते मे २०१७ दरम्यान होत्या. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद बँकेत करण्यात आली. तेथे त्या जुलै २०११ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान कार्यकारी संचालक होत्या. त्यानंतर त्या बँक्च्या अध्यक्षा बनल्या.