26 March 2019

News Flash

समभागांमधून तरुणांना ‘पॉकेट मनी’साठी अतिरिक्त पैसे कसे कमावता येतील!

हल्ली युवा वर्गाला त्यांच्या पालकांकडून हातखर्चासाठी मुबलक पैसे मिळतात.

आज कमावलेला एक रुपया हा उद्याच्या १ कोटी भांडवलाचे बीज आहे. जेव्हा संपत्ती निर्मितीचा प्रश्न येतो त्यावेळी आर्थिक सक्षमता वाढविण्याकरिता समभाग हा सुलभ मार्ग ठरतो. हा ‘मॅरेथोन’सारखा प्रकार आहे. गुंतवणुकीसाठी लवकर सुरुवात करून वेगात सातत्य राखणे ही युक्ती आहे. एका भरीव फरकाच्या दृष्टीने गुंतवणूक १० वर्षे लवकर सुरुवात केल्यास तुमचा पैसा अनेक पटीने वाढतो. त्यासाठी फक्त तुमच्या पॉकेट मनीमधून रु. ५००/१,००० सहज बाजूला काढण्याची गरज आहे.

हल्ली युवा वर्गाला त्यांच्या पालकांकडून हातखर्चासाठी मुबलक पैसे मिळतात. परंतु यातील बहुतेक सगळेच पैसे मौजमजा करण्यासाठी खर्च केले जातात. तुमच्या मित्र—मैत्रिणींसोबत पिझ्झा खाण्यासाठी, सिनेमाची तिकिटे खरेदी करण्यासाठी किंवा क्लबमध्ये जाऊ न मस्ती—मजा करण्यासाठी तुम्ही नक्की किती पैसे वाया घालवता याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?  बरीचशी तरुण मुले धुम्रपानासारख्या वाईट सवयींवर देखील पैसे वाया घालवतात.  तुमच्या महिन्याभरातील खर्चाच्या फक्त १०% पैसे वाचवून तुम्ही केवळ ५०० रुपये देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. राकेश झुनझुनवाला किंवा वॉरेन बफेट यांसारख्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठय़ा प्रस्थांची नावे तुम्ही ऐकली आहेतच.  या सर्वांनी अगदी लहान वयातच समभागांमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली होती. यामुळेच त्यांच्या एकूण संपत्तीत मोठा फरक झाला. निधी व्यवस्थापकाने निवडलेल्या समभाग संग्रहात म्युच्युअल फंड सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (एसआयपी ) मुळे नियमितपणे पैशांची बचत आणि गुंतवणूक करण्याची संधी मिळते. हल्ली पैसे घेऊन ज्याप्रकारे लग्नसोहळ्याचे नियोजन केले जाते त्याप्रकारेच तुम्ही म्युच्युअल फंडाचा विचार करा. तिसरीच कोणीतरी व्यक्ती खूप कष्ट घेते आणि आपण आरामात बसून त्या सोहळ्याचा आनंद उपभोगू शकतो. म्युच्युअल फंडात केवळ ५०० रुपये गुंतवून त्यावर चांगला परतावा तुम्ही मिळवू शकता. गेल्या ५ वर्षांत फंडामुळे दरवर्षी साधारण १५—२० टक्के सहजपणे मिळाले आहेत. जर दरवर्षी फंड २०टक्कय़ांनी वाढला तरीदेखील केवळ ५०० रुपयांच्या सिपमुळे ४८ महिन्यांनंतर तुमची गुंतवणूक जवळपास दुप्पट होऊ शकते. जर एखाद्या महिन्यात केवळ एका आठवडय़ात तुम्ही पिझ्झा खाल्ला नाही तर ५०० रुपये सहज वाचवता येतात.

आपले पालक किंवा घरातील इतर मोठी मंडळी भांडवली बाजाराबद्दल बोलत असल्याचे तरुण मंडळींनी ऐकले असेलच.  भांडवली बाजार ही एक अशी जागा आहे जिथे विविध कंपन्या एकमेकांशी व्यवहार करतात.  जर तुम्ही अगदी कमी किंमतीचा म्हणजे १०० रुपयांचा समभाग खरेदी केला आणि जर तो १२५ रुपयांना विकला तर तुम्ही प्रत्येक समभागामागे २५ रुपयांचा नफा कमवू शकता. जर तुम्ही १०० समभाग खरेदी केले असतील तर एकाच व्यवहारात तुम्हाला २,५०० रुपयांचा नफा मिळू शकतो. लग्न सोहळ्याच्या नियोजकप्रमाणे तुमच्या एसआयपीसाठी कोणता समभाग घ्यायचा हे म्युच्युअल फंड ठरवतो  त्याच पद्धतीने आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणूक करायची असू शकते. याचा अर्थ असा की, ते नक्की किती पैसे गुंतवणार, ते पैसे कोणत्या ठिकाणी गुंतवले जाणार आणि याबदल्यात त्यांना साधारण किती फायदा होणार हे सर्व काही ठरविण्याची या नव्या पिढीची इच्छा असते. थोडक्यात, त्यांना त्यांचा निधी व्यवस्थापक व्हायचे असते.  हे समभाग एसआयपी  धोरणांमुळे शक्य होऊ शकते. ज्याप्रकारे म्युच्युअल फंडासाठी एमएफ एसआयपीचे कार्य चालते  त्याचप्रकारे समभाग एसआयपीमुळे नियमित कालवधीनंतर पूर्वनियोजित प्रमाणात समभाग खरेदी करण्याची मुभा मिळते.

जर तुम्ही हे एका ठराविक कालावधीसाठी केले तर तुम्ही सहजतेने सरासरी कमी किंमतीत जास्त समभाग खरेदी करू शकता. जेव्हा समभागांच्या किंमतीत वाढ होते तेव्हा तुम्ही जास्त फायद्याची अपेक्षा करू शकता. ज्या समभागांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे तो निवडणे आणि दर महिन्याला त्यात एक ठराविक छोटी रक्कम गुंतवत राहणे हेच केवळ तुम्हाला करायचे आहे. अशा प्रकारे गुंतवणूक करून तुम्ही भावी झुनझुनवाला किंवा बफेट नक्की बनू शकता. ज्याप्रकारे तब्येत चांगली राहावी म्हणून तुम्ही दररोज व्यायाम करता त्याचप्रमाणे काही ठराविक समभागांवर नियमितपणे लक्ष देऊन त्यात गुंतवणूक करत राहणे हेच तुम्हाला करायचे आहे.

जर जोखीम उचलण्याची तुमची तयारी असेल तर समभागांमध्ये व्यवहार करून नफा कमावता येतो.  तरुण पिढी सध्या तासान  तास फोनला चिकटून असते.  दररोज केवळ १५—२० मिनिटे देऊन तरुण मंडळी सहजतेने समभागांमध्ये व्यवहार करू शकतात आणि फोनच्या माध्यमातून नफाही कमवू शकतात. अतिजलद तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेल्या मोबाईल ट्रेडिंग अ‍ॅप्सच्या मदतीने भांडवली बाजारातील व्यवहारासाठी सरासरी एक सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. हल्ली तरुण गुंतवणूकदार हे चांगल्या ब्रोकर्सची मदत घेतात.  यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार संशोधनही करता येते आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही करता येतो.  वेब, मोबाईल आणि अ‍ॅप्सवर आधारित व्यवहार यामुळे कधीही अगदी सोप्या पद्धतीने हे काम करता येते.

ब्रोकर्सकडून केले जाणाऱ्या अभ्यासपूर्ण संशोधन सूचना आणि विश्लेषण यामुळे अनेक विद्यार्थी समभाग व्यवहार खूप गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत आहे.  आपण जितक्या लवकर व्यवहार करायला लागतो तितक्याच लवकर त्यातील चुका कमी करण्याची आपली क्षमता वाढते. वयाच्या तिशीनंतर थेट समभागांमध्ये गुंतवणूक करून जोखीम पत्करण्यापेक्षा विशीच्या सुरवातीला जोखीम उचलण्याची आपली क्षमता जास्त असते. गुंतवणूकदाराला समभाग व्यवहार सहजपणे जमू लागले की ते चलन आणि वायदा वस्तूंसारख्या इतर मालमत्तेच्या बाबतीत थोडा धाडसी निर्णय घेऊन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची जोखीम उचलू शकतात. तुम्ही जितक्या लवकर भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि व्यवहाराला सुरुवात केली असेल तितका उच्च परतावा मिळायला मदत होईल.

(लेखक रिलायन्स सिक्युरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

First Published on March 13, 2018 2:05 am

Web Title: pocket money shares