News Flash

सारस्वत सहकारी बँकेकडून ‘प्री-अप्रूव्हड’ शैक्षणिक कर्ज

सारस्वत बँकेच्या पूर्व-मान्यता असणारे (प्री-अप्रूव्हड) शैक्षणिक कर्ज योजनेची काही खास वैशिष्टय़े आहेत.

मुंबई : अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ठरलेल्या करोना महासाथीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे व आकांक्षा साकारता यावीत यासाठी देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने सुलभ व्याजदरातील शैक्षणिक कर्ज योजना आणली आहे. सारस्वत बँकेने गृह कर्ज, वाहन कर्ज, मालमत्ता तसेच सोने तारण कर्जावरील व्याजदर यापूर्वीच कमी केले आहेत.

सारस्वत बँकेच्या पूर्व-मान्यता असणारे (प्री-अप्रूव्हड) शैक्षणिक कर्ज योजनेची काही खास वैशिष्टय़े आहेत. प्रति वर्ष ८.५० टक्के व्याजदर, विद्यार्थिनींकरिता अर्धा टक्क्यांच्या सवलतीसह ८.०० टक्के व्याजदर, अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्काच्या १०० टक्के अर्थसाहाय्य, शून्य प्रक्रिया शुल्क, परतफेड कालावधीची लवचीकता इत्यादी अन्य लाभदेखील या योजनेत आहेत.

भारतातील आणि परदेशातील शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी असलेल्या या कर्ज योजनेत ओपन अ‍ॅण्ड डिस्टन्स लर्निग (ओडीएल) धाटणीच्या अनेक ऑनलाइन कोर्सेसनाही मान्यता देण्यात आली आहे. शिवाय परकीय चलन खरेदी अथवा विदेशात निधी  हस्तांतरणासाठी द्याव्या लागणाऱ्या कमिशनवर २५ टक्क्यांची सूट बँकेने देऊ केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 2:36 am

Web Title: pre approved educational loan saraswat sahakari bank ssh 93
Next Stories
1 नवीन ‘ई-फायलिंग’ संकेतस्थळाविरोधात पहिल्याच दिवशी तक्रारींची रीघ
2 सेन्सेक्स, निफ्टीचा नव्याने विक्रम
3 ‘एसआयपी’ गुंतवणूक आता अधिक जलद
Just Now!
X