सार्वजनिक आयुर्विमा कंपनीला घसरण फटका

मुंबई : देशातील आयुर्विमा उद्योगाने मे २०२० मधील ३,५२७ कोटींच्या तुलनेत  मे २०२१ मध्ये ४,०२९.३५ कोटी नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्यापोटी संकलित केले असले तरी एलआयसीच्या संकलनात घट तर खाजगी विमा कंपन्यांच्या हप्ता संकलनात वाढ झाली आहे.

मे २०२० मधील नवीन विमा योजनेच्या संकलनाच्या तुलनेत एलआयसीच्या (भारतीय आयुर्विमा महामंडळ) नवीन विमा हप्त्यात १२.४ टक्के घसरण झाली असून खासगी क्षेत्रातील उर्वरित २३ विमा कंपन्यांनी मेमध्ये नवीन व्यवसाय विमा हप्त्यात १४.२ टक्के वाढ नोंदवली आहे.

देशातील विमा उद्योगाच्या कामगिरीचा मानदंड समजले जाणाऱ्या नवीन विमा योजना संकलनात यंदाच्या मेमध्ये ५.६ टक्कय़ांची वार्षिक घसरण झाल्याचे  विमा नियामकांने गेल्याच आठवडय़ात जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीच्या नवीन विमा हप्त्यात घसरण होण्यास मुख्यत्त्वे देशात आलेली करोनाची दुसरी लाट कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

एलआयसीचे विमा प्रतिनिधींची नोंदणी मुखत्त्वे पारंपारिक पद्धतीने आणि प्रशिक्षण केंदांतून होत असते. मेमधील देशातील निवडक भागात टाळेबंदी असल्याने नवीन विमा प्रतिनिधींची भरती ठप्प झाली आहे.

दुसरे कारण,  खाजगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात भांडवली बाजार सलग्न विमा योजांचा (यूलिप) वाटा अधिक आहे. तर एलआयसी पारंपारिक विमा योजनांवर निर्भर आहे.

भांडवली बाजार आणि भांडवली बाजार तेजीत असल्याचा लाभ खाजगी विमा कंपन्यांच्या व्यवसाय वृद्धीस कारण ठरला. एलआयसी अजूनही विमा प्रतिनिधींच्यामार्फत आपली उत्पादने विकत आहे. खाजगी विमा कंपन्यांच्या योजना विकत असतात.

एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ आणि आयसीआयसीआय लाईफ या खासगी विमा कंपन्या आहेत. एलआयसीचा वेगवेगळ्या बँकांशी विमा वितरणासाठी करार असला तरी या बँका एलआयसीच्या योजना विकत नसल्याचा निष्कर्ष या आकडेवारीतून समोर आला आहे. प्रवासावर निर्बंध असल्याचा परिणाम एलआयसीच्या नवीन व्यावसायावर झाल्याचे मानले जात आहे.

खाजगी विमा कंपन्यांसाठी बँका हा नवीन व्यवसायाचा सशक्त स्त्रोत आहे. अनेक बँकांनी जीवन विमा कंपन्या प्रवर्तित केल्या आहेत. सहाजिक या बँका आपल्या विमा कंपन्यांच्या व्यवसायाला उत्तेजन देत असल्याने खाजगी विमा कंपन्यांच्या हप्ता संकलनात यंदा वाढ झाली आहे.

– विघ्नेश शहाणे, मुख्याधिकारी, एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्स.