आज ग्राहक विशेषत: पर्यटनाला निघालेले प्रवासी ट्रॅव्हलर्स चेक्सऐवजी कार्ड का पसंती देतात, त्याची काही कारणे आहेत. त्यांना कार्ड सोयीची, सुरक्षित वाटतात, तसेच बँकेकडून पाठवलेल्या ट्रॅन्झ्ॉक्शन अ‍ॅलर्टमुळे कार्डच्या वापराचा मागोवाही ठेवता येतो. तसेच, डेबिट, क्रेडिट वा ट्रॅव्हल कार्डची स्वीकारार्हता ट्रॅव्हलर्स चेक्सपेक्षा अधिक आहे.

१ सोय आणि सुरक्षा यासाठी कॅशलेसला पसंती
आज बहुतांश ग्राहकांना नियोजित प्रवास करणे आवडते. यामध्ये बरेचसे बुकिंग त्यांच्या डेबिट वा क्रेडिट कार्डाच्या वापराने ऑनलाइन केले जाते. आंतरराष्ट्रीय ठिकाणी खर्च करण्यासाठी रोख रकमेची जागा डेबिट/ क्रेडिट किंवा ट्रॅव्हल कार्ड यांनी घेतली आहे. जगभर कार्डाच्या स्वीकारार्हतेचे जाळे मोठे असल्याने रोख रक्कम देऊन खरेदी करण्याचे प्रमाण कमी होत आहे. प्लास्टिक मनीमुळे ग्राहकांना कमालीची सोय दिली जातेच, शिवाय त्यांना खर्चाचा सुलभपणे मागोवाही घेता येतो. कार्ड/ अकाऊंट स्टेटमेंटवर नजर टाकून ग्राहकांना त्यांच्या खरेदीचा मागोवाही ठेवता येतो. बँका क्रेडिट व डेबिट कार्डावरील आंतरराष्ट्रीय चलनातील व्यवहारांवर विविध रिवॉर्डसही देतात.

२ डेबिट व क्रेडिट कार्डे शुल्क आकारतात
विविध डेबिट/ क्रेडिट कार्ड सोबत ठेवून प्रवास करणे हा योग्य निर्णय ठरतो. एखादे कार्ड विशिष्ट कारणाने चालले नाही तर सोबत दुसरा पर्याय असलेला चांगला. साधारणत:, पैसे काढण्यासाठी किंवा पीओएस टर्मिनलवर पैसे देण्यासाठी परदेशात बँका ३.५ टक्के मार्क-अप शुल्क आकारतात. परंतु परदेशातील अनेक र्मचट ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या चलनामध्ये पीओएस टर्मिनलवर थेट व्यवहार करण्याची सोय देतात. उदा. रुपया किंवा डॉलर. यामध्ये मार्क-अप शुल्क आकारले जात नाही.

३ संपूर्ण पारदर्शकता; कोणतेही छुपे शुल्क नाहीत
प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड हे विकसित उत्पादन असून, त्यात कार्डामध्ये ट्रॅव्हलर्स चेक्सचे फायदे समाविष्ट आहेत. ट्रॅव्हल कार्डाच्या वापरामध्ये छुपे खर्च समाविष्ट नाहीत.

४ डेबिट किंवा क्रेडिट कार्डाऐवजी प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड फायद्यचे
प्रीपेड ट्रॅव्हल कार्डमुळे निश्चित परकीय चलन दर दिला जातो. यामुळे ग्राहकांना कोणत्याही त्रासाविना स्थानिक चलनामध्ये व्यवहार करणे शक्य होते. ट्रॅव्हल कार्डाच्या वापराने केलेल्या र्मचट व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उदाहरणार्थ, ग्राहकाने प्रवासास जाण्यापूर्वी प्रति डॉलर ६५ रुपये या दराने ट्रॅव्हल कार्ड खरेदी केले तर त्यास त्याच दराने खरेदी करता येते.

५ विविध ठिकाणांसाठी मल्टि-करन्सी ट्रॅव्हल कार्ड हा चांगला पर्याय
आम्ही मल्टि-करन्सी ट्रॅव्हल कार्डमुळे ग्राहकांना एका कार्डामध्ये १५ प्रकारचे विदेशी चलन सोबत ठेवता येते. या चीप व पिन-एनेबल्ड कार्डासोबत मोफत रिप्लेसमेंट कार्ड येते आणि मूलभूत कार्ड हरवल्यास, चोरीला गेल्यास व त्याचे नुकसान झाल्यास हे कार्ड तातडीने सुरू करता येते. मोबाइल अ‍ॅप वा वेबद्वारे जगभरात कोठूनही ऑनलाइन रीलोड, सर्वसमावेशक प्रवास विमा, प्रवासात आणीबाणीच्या वेळी मोफत सहकार्य, झीरो लॉस्ट कार्ड लाएबिलिटी, असे अनेक फायदेही मिळतात.

६ अन्य बँकांचे एटीएम परदेशात वापरत असताना ही काळजी घ्यावी..
दोन मुद्दे लक्षात घ्यावेत, एक म्हणजे, ३.५ टक्के मार्क-अप शुल्क आणि परदेशात परकीय चलन व्रिडॉ करण्यासाठी आकारलेले कॅश विथड्रॉवल शुल्क. दुसरे म्हणजे, प्रवासी क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, एटीएममधून पैसे काढण्यावर ते काढल्यापासून रीपेमेंटपर्यंत व्याज आकारले जाते, हे समजून घ्यावे.
(लेखक आयसीआयसीआय बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आहेत.)