संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी नव्या भारताल गती द्यायची असल्याचं सांगितलं. तसंच हे दशक भारतासाठी फार महत्त्वाचं असून नव्या भारताच्या निर्माणासाठी गती द्यायची आहे. हे दशक भारताचं असावं यासाठी सरकारकडून पाया रचण्यात आला आहे असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. सोबतच लडाखमधील नागरिकांचंही अभिनंदन केलं. जम्मू काश्मीरमधील नागरिकांनाही मुलभूत हक्क मिळण्याचा अधिकार असल्याचं रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदस्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, “या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. माझं सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षात भारताचा मजबूत पाया रचण्यात आला आहे. हे दशक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपलं संविधान या संसेदकडून तसंच त्याच्या प्रत्येक सदस्याकडून राष्ट्रहिताला प्राधान्य देत देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य कायदा करण्याची अपेक्षा ठेवतं. गेल्या सात महिन्यात संसेदत अनेक इतिहास रचण्यात आल्याचा मला आनंद आहे”.

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधींची इच्छा पूर्ण – रामनाथ कोविंद
“फाळणीनंतर महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की, पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख ज्यांना तेथे राहण्याची इच्छा नाही ते भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवन उपलब्ध करुन देणं भारत सरकारचं कर्तव्य आहे. महात्मा गांधींच्या विचारांचं समर्थन करत प्रत्येक वेळी राष्ट्रीय नेते आणि राजकीय पक्षांनी त्यांना पुढे नेलं आहे. आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्यांच्या इच्छेचा सन्मान करणं आपलं दायित्व आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सुधारित नागरिकत्व कायदा तयार करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण केली आहे”, असं रामनाथ कोविंद यांनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, मी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करतो. जागतिक संघटनेने याची दखल घेत त्यासंबंधी योग्य ते पाऊल उचलण्याचा मी आग्रह करतो.

“माझ्या सरकारचं स्पष्ट मत आहे की, चर्चा आणि संवाद लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करतात. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची हिंसा समाज आणि देशाला दुबळं बनवण्याचं काम करते,” असंही यावेळी रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

आणखी वाचा – #CAA: नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधींची इच्छा पूर्ण – रामनाथ कोविंद

३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक
रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं. यामुळे काश्मीर विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. “३७० कलम आणि ३५ हटवलं जाणं फक्त ऐतिहासिक नाही तर यामुळे त्यांच्या विकासाची दारं खुली झाली आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकास, तेथील संस्कृती आणि परंपरेचं रक्षण, पारदर्शी कारभार करणं माझ्या सरकारची प्राथमिकता आहे,” असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

आणखी वाचा – Budget 2020: आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न – नरेंद्र मोदी

रामनाथ कोविंद यांनी यावेळी सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसंच केंद्र सरकारने केलेल्या कामांमुळे भारताने अनेक जागतिक रॅकिंगमध्ये उडी मारली असल्याचं सांगत अभिनंदन केलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्णयानंतर देशवासियांना शांतता राखल्याबद्दल प्रशंसा केली.