आबालवृद्धांचे लोकप्रिय पाश्चिमात्य खाद्य दालन मॅकडोनल्ड आता अधिक महाग झाले आहे. कंपनीलाही दुहेरी आकडय़ातील महागाईचा फटका बसला असून परिणामी खाद्यपदार्थाच्या किंमती ६ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. सध्याची बिकट आर्थिक स्थिती अद्याप सहा-सात महिने सुधारण्याची शक्यता नसून या कालावधीत टिकाव धरण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे समर्थन कंपनीने केले आहे. कंपनीने चालू वर्षांत दुसऱ्यांदा किंमती वाढविल्या आहेत. हार्डकॅसल रेस्टॉरन्ट कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या मॅकडोनल्ड या खाद्य साखळीने गेल्या आर्थिक वर्षांत २२ टक्क्यांची व्यवसाय वाढ नोंदविली आहे. मूळच्या अमेरिकन कंपनीने १९९६ मध्ये भारतात शिरकाव केला.