लखनऊप्रमाणेच अन्य महापालिकांचे रोखे काढणार; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

मुंबई : जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळ, पायाभूत सुविधा, लघूउद्योग, चित्रनगरी, रस्त्यांचे जाळे उभारून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार के ले जात असून, एक लाख डॉलर्स कोटींची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य करू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त के ला.

लखनऊप्रमाणेच अन्य महापालिकांमध्ये रोखे काढून देशात सर्वाधिक नागरीकरण झालेल्या उत्तर प्रदेशात जनतेकरिता अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध के ल्या जातील, असेही त्यांनी जाहीर के ले.

लखनऊ महानगरपालिके च्या वतीने काढण्यात आलेले रोखे मुंबई  शेअर बाजारात झालेल्या कार्यक्रमात सूचिबद्ध करण्यात आले. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लखनऊ महापालिकेने नागरी कामांसाठी रोखे काढले असून, त्याला प्रतिसादही मिळाला. रोखे काढणारी लखनऊ ही उत्तर भारतातील पहिली महानगरपालिका आहे. रोखे काढून लखनौ महापालिकेने क्रांतीकारी पाऊल टाकले आहे. लवकरच गाझीयाबाद महानगरपालिकेच्यावतीने रोखे काढले जातील. टप्प्याटप्प्याने कानपूर, आग्रा, प्रयागराज, वाराणसी या महापालिकांसाठी रोखे काढले जातील. देशात सर्वाधिक ७०० नागरी स्थानिक स्वराज्य संस्था उत्तर प्रदेशात आहेत. उत्तर प्रदेशच्या २४ कोटी लोकसंख्येपैकी आठ कोटी जनता शहरी भागांमध्ये राहते. शहरी भागातील जनतेला सुविधा मिळाव्यात व शहरांचा विकास व्हावा या उद्देशाने रोखे काढले जात असल्याचेही आदित्यनाथ यांनी सांगितले.

नोएडाजवळ जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळापासूनच ६ कि.मी. अंतरावर जागतिक पातळीवरील चित्रनगरी उभारण्याची योजना आहे. एक हजार एकरात उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त के ला.

‘गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशचे आकर्षण’

तीन वर्षांत उत्तर प्रदेशात तीन लाख कोटींची गुंतवणुकीचे करार झाले. गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशचे आकर्षण आहे. यातूनच उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी चर्चा करण्याकरिता मुंबई भेटीवर आलो. विविध क्षेत्रातील लोकांबरोबर झालेल्या चर्चेतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त के ला.

संरक्षण उत्पादनातही उत्तर प्रदेशात प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी अलिगढ, आगरा, झांशी, चित्रकू टसह सहा उपविभाग तयार करण्यात आले आहेत. अदानी, महिंद्र, एल अ‍ॅण्ड टीसह काही मोठय़ा उद्योगांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. यातील काही जणांबरोबर चर्चा झाल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. राज्यात उद्योग उभारण्याकरिता २० हजार एकर जमीन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत एक लाख डॉलर्स कोटींची करण्याचे उद्दिष्ट निश्चित के ले होते. राज्यात सत्ताबदल झाल्यावर हा विषय मागे पडला. उत्तर प्रदेशने महाराष्ट्राच्या पुढे जाण्याचे उद्दिष्ट निश्चित के ले आहे.

रोख्यांवर ८.५ टक्के व्याज दर

लखनऊ महानगरपालिकेने या रोख्यातून २०० कोटींचा निधी उभारला आहे. हा निधी अमृत प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे. इंडिया रेटिंग्ज आणि ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थांनी या रोख्यांना अनुक्रमे ‘एए स्टेबल’ आणि ‘एए (सीई) स्टेबल’ असा दर्जा दिला आहे. रोख्यांचा कालावधी १० वर्ष आहे. या करपात्र रोख्यांवर वार्षिक व्याज दर ८.५ टक्के निर्धारीत करण्यात आले आहे. ए. के. कॅपिटल सव्‍‌र्हिसेस आणि एचडीएफसी बँक यांनी रोखे विक्रीचे व्यवस्थापन पाहिले.