News Flash

कामत समितीकडून स्थावर मालमत्ता क्षेत्राला अग्रक्रम

गृहनिर्माण क्षेत्रासाठी हे गुणोत्तर नऊ, तर वाणिज्य मालमत्ता विकासकांसाठी १२ राखण्यात आले  आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्ज पुनर्रचनेच्या योजनेसाठी स्थापित के. व्ही. कामत समितीने करोनाकाळाने सर्वाधिक आघात केलेल्या क्षेत्रांपैकी स्थावर मालमत्ता क्षेत्राला झुकते माप दिले आहे. समितीने सद्य:स्थितीचा ताण पडलेल्या उद्योग क्षेत्रांच्या तब्येतीचा वेध घेण्यासाठी पाच निकष निर्धारित केले असून, ते स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी अनुकूल ठरताना दिसत आहेत.

आयसीआयसीआय बँकेचे माजी मुख्याधिकारी राहिलेल्या कामत यांच्या नेतृत्वातील या पाच सदस्यांच्या समितीची रिझव्‍‌र्ह बँकेने ७ ऑगस्टला स्थापना केली आणि समितीने शिफारसींसह आपला अहवाल ४ सप्टेंबरला सादर केला. या शिफारसींनुसार, कर्ज पुनर्रचनेसाठी पात्रतेच्या निकषांमध्ये कंपनीवरील कर, व्याज, घसाराप्रू्व मिळकतीचे तुलनेत तिच्या कर्जदायित्वाचे गुणोत्तर हा प्रमुख निकष आहे. आढावा घेण्यात आलेल्या विविध २६ उद्योग क्षेत्रांत हे गुणोत्तर स्थावर मालमत्ता क्षेत्राला सर्वाधिक राखण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी हे गुणोत्तर नऊ, तर वाणिज्य मालमत्ता विकासकांसाठी १२ राखण्यात आले  आहे.

पुनर्गठित कर्जे ही मार्च २०२२ पर्यंत विशिष्ट निकषांची पूर्तता करतील याची खातरजमा बँकांनी केली पाहिजे, असे कामत समितीने सूचित केले आहे. त्यातून या समितीने सध्याच्या मंदीसदृशतेत दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सुधार दिसून येईल, असाच अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:23 am

Web Title: priority to real estate sector from kamat samiti abn 97
Next Stories
1 व्होडाफोन आयडिया आता व्हीआय
2 अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – राजन
3 व्होडाफोनची ‘आयडिया’: आता ‘या’ नावाने ओळखला जाणार नवा ब्रॅण्ड; मात्र ग्राहकांसाठी चिंतेची बातमी
Just Now!
X