News Flash

परिवहन सेवांसाठी खासगी-सार्वजनिक भागीदारीचा पर्याय अपरिहार्यच

देशातील ९० टक्के लोकसंख्या ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे.

देशातील ९० टक्के लोकसंख्या ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे.

सरकारकडून अल्प गुंतवणूक, अतिरिक्त कर भार, सेवेचा निकृष्ट दर्जा आणि देखरेखीतील वानवा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव यासारख्या अनेक अडचणींनी देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ग्रस्त असून, त्यावर उपाय म्हणून खासगी-सार्वजनिक भागीदारीचे प्रयोग या क्षेत्रात प्रोत्साहित करणे अपरिहार्य ठरेल, असे बस ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय) या बसचालकांच्या देशातील मोठय़ा संघटनेने प्रतिपादन केले आहे.

देशातील ९० टक्के लोकसंख्या ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे. ही सेवा सध्या पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे, तर येत्या २० वर्षांत सार्वजनिक वाहतुकीची मागणी वार्षिक सरासरी १५.४ टक्के दराने वाढणार आहे, असा दावा बीओसीआयचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी केला. बस आणि चार-चाकी प्रवाशांसाठी वाहिलेल्या देशातील पहिल्या ‘प्रवास २०१७’ या प्रदर्शनाच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीओसीआयचे कार्यवाह के. टी. राजशेखरा, मुंबई बस माल संघटनेचे मलिक पटेल, एमएम अ‍ॅक्टिव्हचे जगदीश पाटणकर, फेडरेशन ऑफ टॅक्सी असोसिएशनचे पुष्कराज शेट्टी व्यासपीठावर उपस्थित होते. २८ ते ३० जुलै दरम्यान नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित या प्रदर्शनात या क्षेत्रातील सर्व व्यावसायिक भागीदारांना प्रथमच एका व्यासपीठाखाली आणले जाईल. परिवहन क्षेत्रात सर्वोत्तम खासगी-भागीदारी स्वरूपाच्या नमुन्यासाठी यानिमित्ताने विचारमंथन घडेल, असा पटवर्धन यांनी विश्वास व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:37 am

Web Title: private public partnership for transport services option indispensable
Next Stories
1 भांडवली बाजारातील गुंतवणूक धोरणावर ‘एलआयसी’ ठाम!
2 एटीएममधील नोटांचा खडखडाट सायबर हल्ल्यामुळे नव्हे!
3 मान्सून चाहुलीनं ‘सेन्सेक्स’ भरारी!; निफ्टीही ९५०० पल्याड!
Just Now!
X