देशातील १५ प्रमुख शहरांतून नवउद्यमींसाठी (स्टार्ट-अप) ‘लेमन स्कूल ऑफ आंत्रप्रीन्योरशिपने (एलएसई)’ने जागृती मोहिमेची घोषणा केली आहे. ६ व ७ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथून या मोहिमेस प्रारंभ होणार असून ती पुढील दोन महिने नाशिक, कानपूर, सुरत, विशाखापट्टणम, इंदूर, रायपूर, अमरावती, हैदराबाद, मुंबई, उदयपूर, अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर अशा १५ शहरांत सुरू राहील. या शहरांतील उत्सुक नवउद्यमींसाठी चर्चा, प्रश्नोत्तरांसह, कृती आराखडय़ातील प्रत्येक तपशिलाची नोंद, स्टार्ट-अपसाठी मेंटॉिरग सत्रांचे आयोजन केले जाईल. सहभागासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी आहे.

‘सीड आयटी आयडॉल’चे आयोजन
मुंबई : इंजिनीअरिंग, एमसीएम, एमसीएस, एमसीए आणि संगणकाशी संबंधित सर्व शैक्षणिक उपक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा ‘सीड आयटी आयडॉल’ हा बहुप्रतीक्षित उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने सुरू झाला आहे. उपक्रमाच्या या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील संगणकीय कौशल्यची कसोटी घेतली जाते. आयटी उद्योगातील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्याबाबत विद्यार्थ्यांना जागृत करणे व भविष्यातील स्पर्धात्मकतेसाठी त्यांना सज्ज करणे, असे या स्पध्रेचे उद्देश आहे.