भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार उद्या १ डिसेंबरपासून ‘डेबिट कार्ड’ धारकांना आपल्या ‘डेबिट कार्ड’ने खरेदी करताना आपल्या ‘एटीएम कार्ड’चा चार अंकी पिनकोड नमूद करावा लागणार आहे. त्याशिवाय त्या कार्ड मधून खरेदी केली जाऊ शकत नाही किंवा दुसरे कोणी त्या डेबिट कार्डचा पिनकोड माहित असल्याशिवाय खरेदी करु शकणार नाही.
याआधी ‘डेबिट कार्ड’व्दारे खरेदी करताना कोणत्याही पिनकोड ची गरज नव्हती. डेबिट कार्ड सरळ ‘स्वॅप’ करुन बिल भरता येत होते. आता डेबिट कार्ड ‘स्वॅप’ केल्यानंतर कार्डधारकाला आपला पिनकोड द्यावा लागणार आहे. त्यामुळे खातेधारकांच्या बॅंक खात्यांना सुरक्षा कवच मिळाले आहे. कार्डधारकाला आपला पिनकोड टाकल्याशिवाय बिल भरता येणार नाही.
या निर्णयामुळे डेबिट कार्ड चोरी करुन, बनावट कार्ड बनवून खरेदी करण्यावर आळा बसणार आहे.