07 July 2020

News Flash

‘मोबाईल मनोरा उत्सर्जनातून मानवी आरोग्यावर घातक परिणाम नाही’

आरोग्याचे धोके असल्याचे सांगत दाखल करण्यात आलेल्या मोबाइल मनोऱ्याबाबतची याचिका फेटाळल्या आहेत.

मोबाइल मनोऱ्यातून होणाऱ्या उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत नसल्याचा निर्वाळा हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल मनोऱ्यातून होणाऱ्या उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत नसल्याचा निर्वाळा हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे ‘सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ (सीओएआय) ने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
न्यायालयाने उत्सर्जनाबाबतची भीती दूर करण्यात आली असून आरोग्याचे धोके असल्याचे सांगत दाखल करण्यात आलेल्या मोबाइल मनोऱ्याबाबतची याचिका फेटाळल्या आहेत. न्यायालयाचे मुख्य न्या. मन्सूर अहमद अली आणि न्या. तरलोक सिंग चौहान यांच्या खंडपीठाने संबंधित आदेश आणि संशोधन अभ्यासांचा संदर्भ देत याचिका रद्दबातल केल्या. ते म्हणाले की, मोबाइल मनोऱ्याचे उत्सर्जन आणि मानवी आरोग्य यांना जोडणारा कोणताही पुरावासमोर आलेला नाही. याबाबतच्या अहवालांमधून ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स’ (इएमएफ) ना सामोरे गेल्यामुळे मानवी आरोग्यावर जाणवण्याइतका धोका निर्माण होत नाही, असे दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि एससीईएनआयएचआर यांच्यानुसार इएमएफच्या उत्सर्जनाचा मोठा आरोग्याचा धोका दिसून आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2015 12:49 am

Web Title: radiation from cell towers in india not harmful for human being
Next Stories
1 बस स्थानक आगारात ‘इंडिकॅश’ एटीएम
2 आरामदायी सहलींसाठी तरुणाईची बचत!
3 ‘अ‍ॅमेझॉन’चे सातवे वास्तुभांडार भिवंडीमध्ये
Just Now!
X