27 November 2020

News Flash

बँकांच्या स्वायत्ततेच्या मोदी यांच्या विधानाचे रघुराम राजन यांच्याकडून कौतुक!

सरकारी बँकांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याबाबत तसेच व्यावसायिकता जोपासताना बँकांना भीती न बाळगता व कुणालाही झुकते मान न देण्याबाबत सरकारने केलेल्या मार्गदर्शनाचे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर

| January 10, 2015 01:24 am

सरकारी बँकांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याबाबत तसेच व्यावसायिकता जोपासताना बँकांना भीती न बाळगता व कुणालाही झुकते मान न देण्याबाबत सरकारने केलेल्या मार्गदर्शनाचे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात राजन यांनी सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर राजन यांनी तर राजन यांच्या व्याजदर कपातीच्या धोरणावर अर्थमत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मोदी यांनी पुण्यातील बँक परिषदेच्या ‘ज्ञान संगमा’त बँकांमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याची गरज मांडली होती. तर जेटली यांनी याच व्यासपीठावरून बँकांना स्वायत्तता देण्याचे सुतोवाच केले होते.
दरम्यान, रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी शुक्रवारी कोलकता येथे देशाच्या विकासासाठी बचत व गुंतवणुकीवरील दर वाढायला हवेत, असे मत प्रदर्शित केले. शाश्वत वाढीसाठी हे आवश्यक असून विकासासाठी प्रकल्पांची जलद पूर्णताही हातभार लावू शकते, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:24 am

Web Title: raghuram rajan praises modi statement on public sector bank autonomy
टॅग Raghuram Rajan
Next Stories
1 बदलापूर-अंबरनाथमधील ‘बजेट’ घरांचे प्रदर्शन
2 कृष्णा बिश्त यांना जानकीदेवी बजाज पुरस्कार प्रदान
3 कंपन्यांची विदेशातून विक्रमी कर्ज उभारणी
Just Now!
X