28 January 2020

News Flash

येस बँकेत ‘पेटीएम’ला रस?

राणा कपूर हिस्सा विकून बाहेर पडणार

राणा कपूर हिस्सा विकून बाहेर पडणार

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार प्रमुखपदावरून बाजूला व्हावे लागलेल्या येस बँकेचे सह-संस्थापक व प्रवर्तक राणा कपूर यांनी बँकेतील त्यांचा सर्व हिस्साही विकण्याचा निर्णय घेतला आहे. कपूर व त्यांचे कुटुंबीय बँकेतील ९.६४ टक्के हिस्सा पेटीएमला विकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हा व्यवहार १,८०० ते २,००० कोटी रुपयांचा घरात होण्याची शक्यता आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स प्रवर्तित पेटीएमला जपानी सॉफ्टबँकचे भक्कम आर्थिक पाठबळ आहे. पेटीएमचे प्रवर्तक विजय शेखर शर्मा यांच्याबरोबर राणा कपूर यांची गेल्या महिन्यापासून हिस्सा विक्रीबाबत चर्चा सुरू आहे. मूल्यांकनावरून लांबलेली ही चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

येस बँकेत ६२ वर्षीय कपूर व त्यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या समभागांचे बाजारमूल्य १,५५० कोटी रुपये आहे. कपूर यांचा बँकेत येस कॅपिटल व मॉर्गन क्रेडिट्सद्वारे भागीदारी हिस्सा आहे. कपूर यांच्या तीन कन्या या कंपन्यांच्या संचालक आहेत. मॉर्गन क्रेडिट्सचे समभाग रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाकडे गहाण ठेवण्यात आले आहेत.

राणा कपूर यांच्या येस बँकेच्या संचालक पदाबाबत हरकत घेणाऱ्या सहसंस्थापक मधू कपूर यांच्या न्यायालयीन दाव्यापुढे  २०१५ सालात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेनेही राणा कपूर यांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय पदावर राहण्यास मज्जाव केला होता. मधू कपूर व त्यांच्या कुटुंबीयांचा खासगी बँकेत ८.३३ टक्के हिस्सा आहे.

विजय शेखर शर्मा यांनी २००० मध्ये स्थापन केलेल्या पेटीएमचे बाजारमूल्य १६,५०० कोटी रुपये असल्याचे मानले जाते. सॉफ्ट बँकेसह अलिबाबा, वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे यांचीही पेटीएममध्ये गुंतवणूक आहे. येस बँकेच्या माध्यमातून पेटीएम प्रथमच कोणत्याही वाणिज्य बँकेत हिस्सा राखणार आहे. यापूर्वी उलट, खासगी बँकांनी तंत्रस्नेही मंच खरेदी करण्याची प्रक्रिया पार पाडली आहे.

First Published on September 11, 2019 1:07 am

Web Title: rana kapoor in talks with paytm to sell stake in yes bank zws 70
Next Stories
1 ‘फिच’कडून खुंटीत विकास दर अंदाज
2 छतावरील सौर प्रणालीद्वारे १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य
3 ‘गोल्ड ईटीएफ’ फंडात नऊमाहीत प्रथमच १४५ कोटींचा मासिक ओघ
Just Now!
X