07 July 2020

News Flash

गुंतवणुकीचा दुष्काळच भारताच्या अर्थवृद्धीतील प्रमुख अडसर : राजन

खासगी गुंतवणुकीसह, सार्वजनिक व सरकारची गुंतवणूकही संथ व रोडावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रघुराम राजन

जवळपास आटलेल्या सरकारी तसेच खासगी भांडवली गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा भारताच्या अर्थवृद्धीतील सर्वात मोठा अडसर असल्याचे येथे बोलताना प्रतिपादन केले.

भारताच्या आर्थिक क्षमतांचा पुरेपूर प्रत्यय यावयाचा झाला तर अत्यंत क्षीण बनलेली भांडवली गुंतवणुकीला चालना मिळायला हवी. सध्या अनेक उद्योगांमध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प स्थापित क्षमतेच्या ३० टक्केही उत्पादन घेत नाहीत. खासगी कंपन्यांना नव्याने गुंतवणुकीचा कोणताही मानस दिसत नाही, असा चिंतातून सूर राजन यांनी येथे एका उद्योग मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. खासगी गुंतवणुकीसह, सार्वजनिक व सरकारची गुंतवणूकही संथ व रोडावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या देशाच्या आर्थिक विकासदराचे लक्ष्य हे आधीच्या ७.६ टक्के अंदाजावरून ७.४ टक्क्य़ांवर खाली आणले आहे. सरकारकडून निश्चित केल्या गेलेल्या ८ ते ८.५ टक्क्य़ांच्या अंदाजाच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. परंतु सुधारीत विकासदरही चीनच्या आर्थिक वृद्धीदरापेक्षा सरस असण्याचे कयास आहेत.
सद्यस्थिती फारशी उत्साहवर्धक नसली तरी पायाभूत सोयीसुविधांच्या विकासातून आणि विदेशातून होत असलेल्या गुंतवणुकीतून देशातील खासगी क्षेत्राचे गुंतवणुकीचे मन बनू शकेल, असा आशावादही राजन यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2015 5:15 am

Web Title: rbi governor says drop in public and private investments top concerns
टॅग Rbi Governor
Next Stories
1 स्वाती दांडेकर आशियायी विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी
2 ‘जीएसटी’बाबत राज्यांच्या अर्थमंत्र्यांत मतभेदांची दरी कायम
3 परवडणाऱ्या किमतीतील गृहप्रकल्पांसाठी ‘स्मार्ट साइज्ड’ संकल्पना!
Just Now!
X