आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी रिझव्‍‌र्ह बँकेने आज(मंगळवार) पतधोरण जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे रेपो दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच ‘कॅश रिझर्व्ह रेशो’मध्येही(सीआरआर) बदल करण्यात आलेला नाही.
२०१२ – १३ मधील अनेक तिमाहीदेखील ५ टक्क्य़ांच्या आतच विकास करती झाली. ४.४ टक्के या पहिल्या तिमाहीनंतर दोन्ही तिमाही ४.७ टक्क्य़ांवरच अडखळल्या. नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांसाठी मांडले गेलेल्या हंगामी अर्थसंकल्पातही हा दर ५.५ टक्के अभिप्रेत आहे, तर मार्च २०१४ अखेर हा दर जेमतेम ५ टक्क्य़ाच्या आतच असणार आहे.  
मागील तीन महिन्यात महागाईचा दर ३ टक्क्याने घसरून ८.१ टक्क्यावर आला आहे. हे सर्व या आधीच्या जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या पतधोरणात जसे अपेक्षित केले होते तसेच घडत आहे. यानंतरचे पतधोरण जून महिन्यात जाहीर होणार असून त्याआधी निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाचे नवीन सरकार सत्तारूढ झालेले असेल.रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणामध्ये असे निर्णय अपेक्षित असल्याने आज सकाळी ‘निफ्टी’ने उसळी घेतली. फेब्रुवारीमध्ये चलनवाढीचा दर ४.६८ होता, असे ‘आरबीआय’ने सांगितले. ‘येत्या काही महिन्यांचा विचार करता, हे दर योग्य आहेत,’ असे ‘आरबीआय’चे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून रेपो दरात ०.७५ टक्के वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी विविध उपाय योजना योजल्या आहेत.