बरोबर एक वर्षांपूर्वी एप्रिल २०१५ मध्ये बाजारात आलेल्या ट्रॅनक्विनी या शहरी वेगवान जीवशैलीत चैतन्य व निवांतता प्रदान करणाऱ्या जागतिक शीतपेय ब्रँडने भारतीय बाजारात प्रवेशाची गुरुवारी घोषणा केली.
कंपनीचे संस्थापक अहमद इलाफिफी यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, अल्पावधीत जगाच्या तीन खंडांत २४व्या देशात विस्तारासह, भारतात  स्थानिक स्तरावर उत्पादन घेण्याचाही विचार असल्याचे सांगितले.
‘प्रीमियम’ श्रेणीतील रेड बुल व तत्सम पेयाशी स्पर्धा करणाऱ्या ट्रॅनक्विनीचे दोन प्रकार – फळांची उत्साहवर्धक चव असलेले ‘ट्रॅनक्विनी ओरिजनल’ आणि अभिनव ग्रीन टीचा समावेश असलेले ‘ट्रॅनक्विनी जेड’ ३०० मिली कॅनमध्ये ९५ रुपये किमतीत निवडक ठिकाणी उपलब्ध झाले आहे.