27 September 2020

News Flash

करोनाचा फटका; मुकेश अंबानींनी गमावलं श्रीमंतांच्या यादीतील पहिलं स्थान

सोमवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

करोनामुळे शेअर बाजारात आलेल्या मंदीचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनाही झाला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ४४ हजार कोटी रूपयांचा घट झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईमनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ११.६८ टक्क्यांची घट झाली असून ती आता ४२.२ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. एका दिवसात त्यांना ५.६ अब्ज डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला झालेलं गेल्या ११ वर्षातील हे सर्वात मोठं नुकसान आहे. यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिलं स्थान त्यांना गमवावं लागलं आहे.

सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान कच्च्या तेलावरून दरयुद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ३१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात १९९१ नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण रिलायन्स इंडस्ट्रीजवरही परिणाम करेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. तसंच कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम त्याच्या जीआरएमवर होईल. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम ९.२ डॉलर प्रति बॅरल होता. रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर रिलायन्सचं बाजार मूल्य ७ लाख ५ हजार ६५५.५६ कोटी रूपयांवर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 10:55 am

Web Title: reliance industries corona effect shares down mukesh ambani lost his asias richest man post jud 87
Next Stories
1 करोना, येस बँक संकट: सेन्सेक्स १९०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला
2 ‘या’ दोन देशांमुळे १९९१ नंतर तेलाच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण
3 येस बँक संकट: सहा महिन्यात खातेदारांनी काढले १८ हजार कोटी
Just Now!
X