28 November 2020

News Flash

बिल गेट्स यांच्या व्हेंचरमध्ये मुकेश अंबानी करणार ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

रिलायन्सनं शेअर बाजाराला दिली माहिती

जगातिल दिग्गज उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जीच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचं नाव बिल गेट्स, जेफ बेझोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅक मा, मासायोशी सोन यांसारख्या दिग्गज गुतवणुकदारांच्या यादीत आलं आहे.

या सर्व गुंतवणुकदारांनी बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जी या उपक्रमाच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे. याप्रकारे या फंडमध्ये रिलायन्स ५.७५ टक्क्यांचं आपलं योगदान देणार आहे. पुढील ८ ते १० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यां रिलायन्स ही गुंतवणूक करणार आहे.

काय म्हटलंय रिलायन्सनं  ?

रिलायन्स इंडस्ट्रीजनं गुरूवारी बाजाराला याबाबत माहिती दिली. “कंपनीनं ब्रेकथ्रू एनर्जी सेकंड, एलपीमध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी एक करार केला आहे. ही एक लिमिटेड पार्टनरशिप फर्म आहे. ज्याची स्थापना अमेरिकेच्या डेलवेअर स्टेटच्या कायद्यांतर्गत झाली आहे,” असं रिलायन्सकडून बाजाराला सांगण्यात आलं.

बिल गेट्स यांचा ग्रीन एनर्जी व्हेंचर महत्त्वपूर्ण उपक्रम असून ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गुंतवणूक करून हवामान बदलावरील तोडगा शोधण्याचं काम केलं जातं. या फंडचा उद्देश कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन न करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हा आहे. “या सर्व प्रयत्नांना भारतालाही फायदा होणार असून संपूर्ण मानवजातीलाच याचा उपयोग होईल. या गुंतवणुकीसाठी सध्या रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी घ्यावी लागणारआहे,” असंही रिलायन्सकडून सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 10:42 am

Web Title: reliance industries to invest up to 50 million dollars in bill gates breakthrough energy ventures reserve bank approval jud 87
Next Stories
1 महागाईला अन्नधान्य किंमतवाढीची फोडणी
2 अर्थउभारी वेगवान
3 आठ सत्रांतील तेजीला खंड; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण
Just Now!
X