खासगी दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओनेही नजीकच्या दिवसात मोबाइल सेवा शुल्कवाढीचे संकेत दिले आहेत.

कंपनी येत्या काही आठवडय़ांत तिच्या फोन कॉलसह डाटा सेवेचे शुल्क वाढवेल, असे रिलायन्स जिओने मंगळवारी स्पष्ट केले. अन्य कंपन्यांप्रमाणे आम्हीही सरकार, नियामकांबरोबर शुल्क बदलाबाबत चर्चा करत असून यामुळे सध्याच्या डिजिटलप्रणालीच्या वाढत्या वापरामुळे डाटा क्रयशक्तीवर संभाव्य शुल्कवाढीचा विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास रिलायन्स जिओने व्यक्त केला आहे.

गेल्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाच्या नोंदीला सामोरे जावे लागलेल्या व्होडाफोन आयडिया तसेच भारती एअरटेलने सोमवारीच मोबाइल शुल्कवाढीचा निर्णय जाहीर केला. वाढीव दर येत्या १ डिसेंबरपासून लागू होतील असे स्पष्ट करतानाच नेमक्या किती प्रमाणात व कोणत्या सेवेचे दर वाढतील, हे मात्र जाहीर केले नाही.