News Flash

आता रिलायन्सची जिओ पेमेंट बँक; आरबीआयकडून हिरवा कंदील

मार्चअखेरीस सुरू होणार

रिलायन्स जिओ सिमकार्डच्या मोफत सेवेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) आणखी एक यश संपादन केले आहे. स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ पेमेंट बँकेला रिझर्व्ह बँकेचा हिरवा कंदील मिळाला आहे. ‘लाईव्ह मिंट’च्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँकेने जिओ पेमेंट बँकेला अंतिम मंजुरी दिली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत रिलायन्स जिओ पेमेंट बँक सुरू होणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेली रिलायन्स जिओ पेमेंट बँक मार्चअखेरीस सुरू होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. आरआयएलच्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ने नुकताच १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी हे मोठे यश संपादन केले आहे. आता जिओ पेमेंट बँकेला रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदील दिला आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत जिओ पेमेंट बँक सुरू होणार असल्याची माहिती रिलायन्समधील काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिओ पेमेंट बँकेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ग्राहकांसाठी नवनवीन योजना जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीला अधिकाधिक महसूल मिळावा, हा त्यामागील हेतू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जिओ सिमकार्डच्या माध्यमातून ग्राहकांची संख्या दहा कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. मोफत सुविधा दिल्यास हा आकडा गाठणे कठिण नाही, असेही वृत्तात म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या नवीन ग्राहकांना बँकींग सेवेकडे आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आणण्याच्या विचारात आहे. त्या योजना वितरकांच्या माध्यमातून नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान जुलै २०१६ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँकेत जिओ पेमेंट बँकेसंबंधी करार झाला होता. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे ७० टक्के भागभांडवल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2017 5:31 pm

Web Title: reliance jio payments bank gets rbi approval start operations reliance industries ltd and state bank of india
Next Stories
1 ‘जीडीपी’वाढीचे निर्देशांकांना बळ
2 ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे दिमाखदार प्रकाशन
3 सहाराला ५,०९२.६ कोटी जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश
Just Now!
X