News Flash

रिलायन्स निप्पॉन लाइफ एएमसीची दमदार नोंदणी

भांडवली बाजारात रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीची दमदार नोंदणी झाली.

म्युच्युअल फंड कंपनीची नोंदणी सोमवारी सकाळी राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) झाली. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी, त्यांच्या आई कोकिळाबेन, पुत्र जय अनमोल, पत्नी टीना तसेच निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे उपाध्यक्ष ताकेशी फुरुइची, ‘एनएसई’चे विक्रम लिमये, सूचिबद्ध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का आदी उपस्थित होते.

१७.४२ टक्के वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजारात प्रवेश

सप्ताहारंभीच निर्देशांकांची विक्रमी नोंद करणाऱ्या भांडवली बाजारात रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीची दमदार नोंदणी झाली. कंपनीने जारी केलेल्या प्रति समभाग २५२ रुपयांच्या तुलनेत समभागाची नोंदणी सकाळच्या व्यवहारात तब्बल १७.४२ टक्क्य़ांनी उंचावत २९५.९० रुपयांवर झाली.

व्यवहारात समभागाने २९९ पर्यंत झेप घेतली. तर २७८ हा त्याचा सत्रातील तळ होता.

३.८४ लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन (११.४ टक्के बाजारहिस्सा) हाताळणाऱ्या रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील या कंपनीने राबविलेल्या १,५४० कोटी रुपयांच्या प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेला ८१.५४ टक्के प्रतिसाद मिळाला होता.

प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविणारी २००८ मधील रिलायन्स पॉवरनंतरची समूहातील ही दुसरी कंपनी आहे.

समूहातील रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्याही सूचिबद्ध आहेत.

रिलायन्स निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनी या देशातील पहिल्या म्युच्युअल फंड कंपनीची नोंदणी सोमवारी सकाळी राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) झाली. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी, त्यांच्या आई कोकिळाबेन, पुत्र जय अनमोल, पत्नी टीना तसेच निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे उपाध्यक्ष ताकेशी फुरुइची, ‘एनएसई’चे विक्रम लिमये, सूचिबद्ध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का आदी उपस्थित होते.

आतापर्यंतचे २०१७..

सूचिबद्ध कंपन्या : २८

जारी किंमतीपेक्षा

२०% अधिक : १०

जारी किंमतीपेक्षा

कमी नोंद : १०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 1:00 am

Web Title: reliance nippon life shares settle 12 percent higher on first day of listing
Next Stories
1 एचडीएफसीचे ऑनलाइन निधी हस्तांतरण मोफत
2 कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नाचा हंगाम आणि गुंतवणूकदारांचा पुढचा मार्ग
3 नवीन रोजगारनिर्मिती ठप्प, आहे त्या नोकऱ्यांवर गंडांतर..
Just Now!
X