आपल्या व्यवसाय विस्तार धोरणानुसार रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनी चालू आर्थिक वर्षांत २०,००० विमा प्रतिनिधी सामावून घेणार आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या एक लाख विमा प्रतिनिधी असून नव्याने रुजू होणाऱ्यांचे प्रमाण हे २० टक्के असेल.
विमा प्रतिनिधी हे विमा व्यवसायाचा कणा आहेत; त्यांच्यासाठी कोणतीही नवी गुंतवणूक करणे केव्हाही लाभदायीच असेल, असे या विस्तार योजनेबाबत कंपनीचे मुख्य एजन्सी अधिकारी मनोरंजन साहू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
कंपनीचे गुजरातमध्ये ८५०० विमा प्रतिनिधी आहेत. तर या राज्यात कंपनीच्या ५६ शाखा आहेत. रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनी ही रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील वित्त क्षेत्रातील कंपनी आहे.