हक्कभाग आणि हिस्सा विक्रीतून विक्रमी गुंतवणूक खेचत सहामाहीतच कर्जमुक्त होणाऱ्या बिलियन डॉलर रिलायन्स समूहाने नव्या वर्षांपासून ५जी दूरसंचार सेवा सुरू करत असल्याची घोषणा बुधवारी केली. या क्षेत्रातील अव्वल चिनी तंत्रज्ञानाची बहिष्कार मोहीम वेग घेत असतानाच समूहाने हे तंत्रज्ञान पूर्णत: देशी बनावटीचे असल्याचे जाहीर केले.

प्रारंभिक भागविक्रीपासूनची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा समूहाच्या स्थापनेनंतर प्रथमच आभासी माध्यमातून घेण्यात आली. समूहानेच विकसित केलेल्या जिओमीटच्या व्यासपीठावर रिलायन्सचे अध्यक्ष मुके श अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना गेल्या वर्षांच्या विक्रमी लाभार्थी वित्तीय निष्कर्षांला व्यवसाय विस्तार, उत्पादन सादरीकरणाच्या घोषणांची जोड दिली.

आपल्या दीड तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेचा दोन वेळा उल्लेख करत अंबानी यांनी समूह २०२१ मध्ये स्वदेशी बनावटीचे ५जी हे वेगवान दूरसंचार तंत्रज्ञान आणेल, असे जाहीर केले.  कं पनीने गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रातील अनेक नवउद्यम आपल्याकडे घेतले असून नव अभियंत्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ही ५जी सेवा असेल, असे नमूद केले.

२जी मुक्ततेसाठी गुगलचे अर्थपाठबळ

देशातील ३८ कोटी भारतीय आपल्या जिओ व्यासपीठावर नोंदविणाऱ्या रिलायन्स जिओने २जी तंत्रज्ञानयुक्त फिचर फोन वापरणाऱ्या भारतीय ग्राहकांनाही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न जाहीर के ला. याकरिता आघाडीची सर्च इंजिन गुगलचे ४.५ अब्ज डॉलरचे सहकार्य घेण्यात आल्याचे अंबानी यांनी सांगितले. जिओ प्लॅटफॉम्र्समधील ७.७ टक्के  हिस्सा विक्रीद्वारे गुगलच्या सहकार्याने देशातील सध्याचे ३५ कोटी २जीधारक मुक्त होऊन अद्ययावत ४जी तंत्रज्ञानाच्या कक्षेत येतील, असेही स्पष्ट करण्यात आले. रिलायन्स जिओकरिता गुगल कंपनी अ‍ॅण्ड्रॉइड आधारित संचारप्रणाली विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.